आयपीएस अधिकाऱ्यांनी झाडाखाली भरवली शाळा ; शेवराई संस्थेचा कौतुकास्पद उपक्रम

पुणे

अशी शाळा कधी न भरली, लाल दिव्याची गाडी कायद्याचे शिक्षण देण्यासाठी फाटक्या पालासमोर उभी राहीली, शेवराई सेवाभावी संस्थेचा नाविन्य व कौतुकास्पद उपक्रम, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात राहाडगाव येथे औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी तळपत्या उन्हात लिंबाच्या झाडा खाली ज्ञानाची शाळा भरवली, त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत स्वछता, कंलकीतजिवन, कायदा , कष्ट, संन्मान, सविधान, घटना, अशा विविध विषयावर आय.पी.एस.डाॅ पवन बन्सोड यांनी विविध विषयांवर धडे शिकवले.

आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी आदिवासी कुटुंबातील गरीबांवर होणारा अन्याय अत्याचार कशा स्वरुपात होतात राज्यातील हजारो तरुण पिढी व्यसनाला बळी पडतात गरीब कुटुंबांची उपासमारी कसी होते. ते अन्याच्या डोव्हात कसे बुडतात. त्या पिढीत लोकांना कसे बाहेर काढता येतील या विषयी सखोल माहिती दिली.तर डाॅ.किशोर उडान यांनी रोजंदारी साठी या गरीब कुटुंबातील दहा कुटुंबाना शिलाई मशिन देऊन रोजंदारी निर्माण करून देण्याचे ठरविले.

उपविभागीय पोलीस अधीक्षक,विशाल नेहुल यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, तर पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांना तालुक्यातील कष्टकरी आदिवाशी कुटुबांला पोलीस संरक्षण देण्याची जबाबदारी स्वीकारली.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत आयपीएस.डाॅ पवन बन्सोड, आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, डीवायएसपी.श विशाल नेहुल, पीआय पवार, प्रा.केशव बंनसोडे, आयजी चव्हाण, भु-या भोसले, बिआयबी चव्हाण, अजिनाथ डोंगरे, ग्रामस्थ तसेच आदिवासी कुटुंबातील लोक मोठ्या संख्येत ऊपस्थितीत होते..एक वरीष्ट आयपीएस अधिका-याने झाडाखाली भरवले या शाळेचे कौतुक संपूर्ण राज्याभरातुन होत आहे.

Previous articleनारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाच्या यात्रेला प्रारंभ
Next articleआगामी उन्हाळी सुटयांसाठी एमटीडीसी पर्यटकांना देणार निखळ आनंदाबरोबरच विविध सोयी-सवलती