श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहजयोग परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम

नारायणगाव : किरण वाजगे

सहजयोग परिवाराच्या संस्थापिका परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांचे जन्मशताब्दी वर्ष २१ मार्च २०२२ ते २१ मार्च २०२३ संपूर्ण जगात साजरे होत आहे. या वर्षांमध्ये सहजयोग परिवाराच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांसह संपूर्ण देशभर तसेच विदेशात देखील सहज योग ध्यानधारणेचे महत्त्व व श्री माताजी निर्मलादेवी यांच्या कार्याचा नेमका हेतू काय आहे, हे सांगण्यासाठी व कुंडलिनी जागृती बरोबर ध्यानधारणेच्या माध्यमातून संपूर्ण मानवाची प्रगती कशी होते या गोष्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सहजयोग रथयात्रा, ध्यानधारणा पद्धती सर्वसामान्य माणसापर्यंत पोचविण्याचे कार्य सर्वत्र सुरु करण्यात आले आहे.

याच अनुषंगाने गेल्या दोन दिवसांपासून खेड, आंबेगाव तालुक्यातील विविध गावे तसेच जुन्नर तालुक्यातील बेल्हे, राजुरी, आणे या गावांमध्ये पुणे जिल्ह्यातील सहजयोगी बंधू-भगिनी गावागावात थेट सर्वसामान्य माणसांपर्यंत सहजयोगाची माहिती देत आहेत.

सहज योग नेमका काय आहे श्री माताजी निर्मला देवी यांनी सहज योगाद्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये होणारे अमुलाग्र बदल तसेच, त्याची होणारी प्रगती, निर्णयक्षमता याच बरोबर कृषी, अध्यात्म, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सहज योग ध्यानधारणेचे होणारे फायदे याविषयी माहिती देण्यात येत आहे.बेल्हे, राजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक अबाल, वृद्ध महिला सहभागी झाले होते.

Previous articleएमआयटीच्या विद्यार्थ्यांनी घेतला गोविंद मिल्क सोबत लाईव्ह प्रोजेक्टचा अनुभव
Next articleपेंशन धारकांना किमान पेंशन पाच हजार रूपये व महागाई भत्ता देण्याची मागणी