एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी घेतला गोविंद मिल्क सोबत लाईव्ह प्रोजेक्टचा अनुभव

उरुळी कांचन

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट(मिटकॉम) च्या विद्यार्थ्यांनी नुकतीच गोविंद मिल्कच्या प्रकल्पाला भेट दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी लाईव्ह प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला. मिटकॉमच्या ऍग्री आणि फूड बिझिनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरात असलेल्या गोविंद मिल्क सह लाइव्ह प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांनी शहरातील एक हजाराहून अधिक किरकोळ विक्रेत्यांच्या मुलाखती घेतल्या. या प्रोजेक्टचा मुख्य उद्देश्य हा दुग्ध व्यवसायातील संधी आणि आव्हाने जाणून घेणे होता.

यावेळी एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, गोविंद मिल्कचे श्री अक्षय शिंदे, डॉ. अजीम शेख, डॉ. प्रीती टिळेकर सुरकुटवार आदी उपस्थित होते.

Previous articleउरुळी कांचन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विवेक पाटील यांची निवड
Next articleश्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सहजयोग परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रम