उरुळी कांचन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विवेक पाटील यांची निवड

उरुळी कांचन

येथील विवेक पुरुषोत्तम पाटील यांची उरुळी कांचन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदरची निवड उरुळी कांचन शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रामभाऊ तुपे यांनी केली.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेष्ठ नागरिक सेलचे उपाध्यक्ष बाळकृष्ण काकडे, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस प्रसाद कांचन, उद्योजक योगेश कांचन, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुरकुटे, विकी चव्हाण आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी निश्चितच यशस्वीपणे पार पाडणार सर्वांना बरोबर घेऊन असे शहर उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी सांगितले.

Previous articleपेरणे- वढु खुर्द येथील ‘शीवरस्ता’चं झालायं ‘गायब
Next articleएमआयटीच्या विद्यार्थ्यांनी घेतला गोविंद मिल्क सोबत लाईव्ह प्रोजेक्टचा अनुभव