पेरणे- वढु खुर्द येथील ‘शीवरस्ता’चं झालायं ‘गायब

हवेली तालुक्यातील पेरणे -वढु खुर्द या दोन गावांंच्या सिमाहद्दीवरील शीवरस्ताचं अतिक्रमण होऊन गायब झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.रस्ताचं गायब (अतिक्रमणीत )झाल्याने परिसरात राहणाऱ्या व या रस्त्यावर येणे-जाण्यासाठी अवलंबून असणाऱ्या नागरिकांची व शेतकरी बांधवांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

महसूल नकाशानुसार ३३ फूट रुंद असणाऱ्या या शीव रस्त्यालगत अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी,विकसकांनी शेतजमीनीत प्लॉट करुन त्या प्लॉटची विक्री केली आहे.पुढे त्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आलेली आहेत.त्याचबरोबर काही शेतकरी बांधवांनी रस्त्यावरचं शेती करुन वहिवाट वाढवली आहे.

त्यामुळे नकाशावर असणारा शीवरस्ताचं गायब करण्यात आला आहे कि काय?असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे.
नकाशातील शासकीय रस्त्यावर अतिक्रमण होऊ न देणे,अतिक्रमण करण्याचा प्रयत्न कोणी करत असल्यास त्या अतिक्रमण धारकांस नोटीस पाठवणे,त्यावर महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे हि जबाबदारी स्थानिक महसूल सजा तलाठी,मंडलाधिकारी व त्यानंतर तहसीलदार यांची असते.

गेले ७ – ८ वर्षापासून अतिक्रमणीत झालेला शीवरस्ता सार्वजनिक वापरासाठी खुला करण्याबाबत काही स्थानिक सजग नागरिक तालुका महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी अर्ज,विनंत्या करत होते.त्यानंतर अ.भा.ग्राहक पंचायत,हवेली तालुक्याच्यावतीने हि जवळपास तीन वेळा लेखी पत्रव्यवहार,स्मरणसंदेश करण्यात आला होता. यानंतरही स्थानिक प्रशासन टोलवाटोलवी पलीकडे कोणतीही योग्य भूमिका घेत नसल्याने अखेर अखिल भारतीय ग्राहक पंचायत,हवेली तालुका यांच्या माध्यमातून सरकारी नकाशावरील शीव रस्ता कायदेशीर कार्यवाही करून कायमस्वरूपी सार्वजनिक वापरासाठी खुला करण्याबाबत विभागीय आयुक्त,पुणे विभाग व जिल्हाधिकारी,पुणे यांना लेखी स्वरुपात निवेदन देण्यात आले आहे.

योग्य ती कायदेशीर कार्यवाही करुन लवकरात लवकर पेरणे- वढु खुर्द शीवरस्ता खुला करण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन प्रशासनाच्यावतीने हवेली उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी यावेळी दिले आहे.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत,हवेली अध्यक्ष संदीप शिवरकर, उपाध्यक्ष विठ्ठल ठोंबरे,संघटक गणेश सातव,सचिव कैलास भोरडे,स्थानिक नागरिक जीवन सुकाळे हे उपस्थित होते.

Previous articleसावंत प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार राहुल शिंदे व ह.भ.प आंनद तांबे महाराज यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
Next articleउरुळी कांचन शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विवेक पाटील यांची निवड