वाकी बुद्रुक सोसायटीवर भैरवनाथ शेतकरी पॕनलचे वर्चस्व; १३/० ने दणदणीत विजय

चाकण – सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत १३ जागांवर दुरंगी लढत झाली. 28 उमेदवारांनी नशीब अजमावयाचा प्रयत्न केला मात्र १३ विरोधात शुन्य असा दारुण पराभवाला एका पँनलला जावे लागले.

मतदानानंतर मतमोजणी करण्यात येऊन लगेच मत्रपत्रिकावर मोजणी करुन निकाल निवडणुक निर्णय अधिकारी जे.बी. मुलाणी यांनी जाहिर केले. मतदान केंद्र प्रमुख संपत मलघे यांनी कामकाज पाहिले.

१३ जागांसाठी ३२९ एकुण मतदानापैकी ३१७ मतदान झाले यामध्ये अंगठीच्या चिन्हावर सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. चंद्रभागा गारगोटे, सविता सोनवणे, मारुती गायकवाड, ज्ञानेश्वर टोपे, रामदास चव्हाण, विनोद टोपे, सोमनाथ टोपे, काळुराम टोपे, धनजंय कड, बापु गारगोटे,रामचंद्र गारगोटे, ज्ञानेश्वर टोपे, दत्तात्रय टोपे हे 13 उमेदवार विजयी झाल्याचे सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र काबंळे यांनी माहिती दिली.

उमेदवार निहाय निवडणुक निकाल पुढीलप्रमाणे ः सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी गटातील आठ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात होते. एकुण मतदान ३१७ पैकी ३४ मते बाद झाली. तर २८३ मते वैध ठरली. धनंजय रामदास कड ( १५१), शुभम ताईराम कड (१२३), काळुराम शंकर गारगोटे (११९), तुकाराम गोंविद गारगोटे (१२०), बापु खंडु गारगोटे (१५०), रामचंद्र महादु गारगोटे (१४६), बबन गेणु जरे (११८) , भगवान सुदाम जाधव (०६), अशोक काळुराम टोपे (११३), एकनाथ रामभाऊ टोपे (१०९), काळुराम नारायण टोपे (१५९), दत्तात्रय संतु टोपे (१४२), बबन गोविंद टोपे (०२), वसंत देवराम टोपे (११४), विनोद पोपट टोपे (१८०), सोमनाथ बाळु टोपे (१६८), ज्ञानेश्वर जयवंत टोपे (१४३) , नामदेव तुकाराम पारधी (१०३)

महिला प्रतिनिधी गटातील दोन जागांसाठी झालेल्या चौरंगी लढतीत चंद्रभागा बबन गारगोटे (१६४),विमल अर्जुन गारगोटे (१२७), सुरेखा लक्ष्मण टोपे (१४७), आणि सविता बबन सोनवणे (१६१), या गटात १२ मतपत्रिका बाद झाल्या ३०५ मते वैध ठरली.

ओबीसी गटात एका जागेसाठी दुरंगी लढतीत दत्तात्रय रामचंद्र टोपे (११२), ज्ञानेश्वर दगडु टोपे (१९१), या गटात १४ मते बाद झाली तर ३०३ मते वैध ठरली.

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटाच्या एका जागेवर झालेल्या दुरंगी लढतीत तब्बल ९४ मते बाद झाली. तर २२३ मते वैध ठरली. राजाराम चंदर गजरे (१३१), मारुती भिका गायकवाड (१७२)

भटक्या जाती विमुक्त जमाती प्रतिनिधी गटात अंगठी विरोधात अपक्ष उमेदवार कुकर चिन्ह अशी लढत एका जागेवर झाली. यात अगंठी चिन्हाने विजयी मिळवला फक्त चार मते बाद ठरली तर ३१३ मते वैध ठरली. रामदास बंडु चव्हाण (१८५) प्रितम शंकरसिंग परदेशी (१२८)
अंगठी चिन्हावर लढलेल्या १३ उमेदवारांना पडलेल्या मतांचा विचार करता सर्वाधिक मते रामदास चव्हाण यांना मिळाली तर पँनलप्रमुख विनोद उर्फ पप्पु टोपे यांनी १८० मते मिळवत मतदारांची मने जिकंली

Previous articleनारायणगावात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा
Next articleगावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला मंचर जवळ अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई