गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला मंचर जवळ अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

किरण वाजगे – पुणे ग्रामीण परिसरात बेकायदेशीररित्या पिस्तूल वाळगणाऱ्या एका आरोपीवर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली आहे. सोमवार (दि.१८) रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबर्‍या मार्फत माहिती मिळाली. त्यानुसार रोहन शिंगोले याने आपल्या कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची माहिती मिळताच मंचर (ता. आंबेगाव) कडे जाणाऱ्या रस्त्यावर कँनाँल च्या बाजूला संबंधित आरोपी उभा असल्याची माहिती मिळाल्याने त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव रोहन हिराजी शिंगोले ( वय २०, रा. कुंभारवाडा, तालुका खेड, जिल्हा पुणे ) असे सांगितले.त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल आणि एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, अप्पर पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, स.पो. निरिक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर, अमोल शेंडगे, संदीप वारे, अक्षय नवले, धीरज जाधव, निलेश सुपेकर पुनम गुंड, दगडू विरकर, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी विशेष परिश्रम घेऊन केली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सातत्याने आरोपी शोधण्यामध्ये व विविध गुन्ह्यांचा तपास करण्यामध्ये मोठी कामगिरी केल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleवाकी बुद्रुक सोसायटीवर भैरवनाथ शेतकरी पॕनलचे वर्चस्व; १३/० ने दणदणीत विजय
Next articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी समिरभाऊ थिगळे यांची फेरनिवड