गावांचा कायापालट करण्यासाठी पाणलोट उपचार उपक्रम फायदेशीर-डॉ.अभिनव देशमुख

दिनेश पवार ,दौंड

अवर्षण ग्रस्त भागातील गावांचा कायापालट करण्यासाठी पाणलोट उपचार उपक्रम खूप फायदेशीर असल्याचे मत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले.क्रोम्प्टन सीएसआर फाउंडेशन व भारतीय बहुउदेशीय खादी व ग्रामोद्योग शिक्षण संस्था वर्धा,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कौठडी (ता.दौंड) येथे गेली तीन वर्षांपासून पाणलोट उपचार उपक्रम राबविण्यात येत आहे.यात झालेल्या कामांचा शुभारंभ पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सीसीएफच्या सीएसआर प्रमुख सीमा पावसकर, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती चे वैभव तांबे,उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड चे राहुल धस,सीसीएफ चे व्हाईस चेअरमन शक्तीपरिंदा,तालुका कृषी अधिकारी दौंड चे राहुल माने,दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे,भारतीय बहुउद्धेशिय संस्थेचे तंत्रअधिकारी दत्तात्रय लोंढे,सरपंच प्रीती मेरगळ, ग्रामसेविका अस्मिता चव्हाण,प्रकल्प समन्वयक अमित खंडाळे, प्रकल्प संचालक प्रकाश जगताप उपस्थित होते.

या उपक्रमाअंतर्गत माती नाला बंडिंग,सिमेंट नाला बंडिंग,समतल समचर बांधणी,गॅबियन बांध,विहीर पुनर्भरण अशी भरीव कामे करण्यात आल्याने परिसरात भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाचे कौतुक केले व यामुळे आमच्या शेतीला नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.दिनेश पवार यांनी केले,

Previous articleमहावीर जयंतीनिमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम उत्साहात
Next articleकवठे येमाई येथील आंबेडकर नगर मध्ये भीम जयंती ऊत्साहात साजरी.