महावीर जयंतीनिमित्त नारायणगावात विविध कार्यक्रम उत्साहात

नारायणगाव : (किरण वाजगे)

महावीर जयंतीदिनी जैन सकल संघ आणि नारायणगाव (ता. जुन्नर) येथील समस्त जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून श्री महावीर प्रतिमा मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, महाप्रसाद, प्रवचन तसेच लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.येथील भगवान महावीर भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात हिमानीजी महाराज साहेब यांनी गेली पाच दिवसांपासून विविध विषयांवर मार्गदर्शन पर व्याख्यान व प्रवचन दिले.

यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ आतार, माजी उपसरपंच संतोष वाजगे, अजित वाजगे, विकास नाना तोडकरी, राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके, सुरज वाजगे, रोहिदास केदारी, एड.शिवदास तांबे, संतोष दांगट, आशिष वाजगे, गणेश वाजगे, तसेच जैन सोशल ग्रुप चे अध्यक्ष अशोक खिवंसरा, मनोज भळगट, धनेश शेलोत, अशोक गांधी, किशोर पोखरणा, अतुल कांकरिया, तसेच संकलेचा, कोठारी, मुथ्था, गांधी, गुंदेचा, देसरडा, भंडारी, बेदमुथा, गुगळे, चोरडिया आदी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, दहशतवादी विरोधी पथकाचे स.पो. निरीक्षक अर्जुन मोहिते, सचिन कांकरिया, अमर भागवत, विजय मुनोत, रमेश चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये “नारायणगाव विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन तथा पत्रकार किरण वाजगे यांनी आज ४१ व्या वेळी रक्तदान केले”. शिबिरात एकूण ७५ जणांनी रक्तदान केले.

Previous articleज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या ७२५ व्या वर्षानिमित्त राजभवन येथे अजानवृक्षाचे रोपण
Next articleगावांचा कायापालट करण्यासाठी पाणलोट उपचार उपक्रम फायदेशीर-डॉ.अभिनव देशमुख