कवठे येमाई येथील आंबेडकर नगर मध्ये भीम जयंती ऊत्साहात साजरी.

      • कवठे येमाई (धनंजय साळवे)- कवठे येमाई येथील आंबेडकर नगर मध्ये भीम जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली.संपुर्ण भीमनगर व बुध्द विहार परीसरात आकर्षक विद्युत रोषनाई करण्यत आली होती. प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेंचे पुजन करण्यात आले .यावेळी सामुदाईक बुध्दवंदना घेण्यात आली.महिला भगिनींमध्येही जयंतीचा ऊत्साह खुप होता.

नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. आंबेडकर जयंती ही एका समाजापुरती एका वस्तीवर साजरी न होता सर्व समाजाने सार्वजनिक ठिकाणी साजरी करणे आवश्यक आहे असा विचार मांडला.सर्वांनी उच्च शिक्षण घेतले पाहीजे व तरुणांमध्ये,समाजात जी व्यसनाधिनता वाढीला लागली आहे ती कमी झाली पाहिजे तरच बाबासाहेबाबांचे शिका व संघटीत व्हा हा विचार रुजला जाईल.जाती धर्मामध्ये जातीय द्वेष पसरविला जातो ते देशाच्या एकात्मतेला घातक आहे.

यावेळी मशिदीच्या भोंग्या संदर्भातील राज यांच्या भुमिकेचा सा.कार्यकर्ते शरद उघडे यांनी आपल्या भाषणात निषेध केला.यावेळी युवानेते बाळासाहेब डांगे,मा.सरपंच वैभवीताई उघडे,मा.ग्रा.पं.सदस्य मिठ्ठुशेठ बाफना, ग्रा.पं.सदस्य रामदास इचके,मा.ग्रा.पं.सदस्य हर्षल आबा काळे,युवा नेते दिनेश काळे,पिंटुशेठ गायकवाड,मा.ग्रा.पं.सदस्य रितेश शहा,मा.उपसरपंच बाजीराव उघडे,विजय उघडे,चित्तरंजन उघडे,विजय उघडे, श्रीनिवास उघडे, ढोरके बंधु,राजु उघडे, अमर उघडे,सावळेराम उघडे, शंकर उघडे, अरुण उघडे,सुदाम उघडे,अंकुश उघडे ईत्यादी जण उपस्थित होते .कार्यक्रमानंतर जेवणाची उत्तम व्यवस्था भीम अनुयायांकडुन करण्यात आली होती.

Previous articleगावांचा कायापालट करण्यासाठी पाणलोट उपचार उपक्रम फायदेशीर-डॉ.अभिनव देशमुख
Next articleकवठे येमाईत भीम जयंती ऊत्साहात साजरी