राजगुरूनगर मध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा

राजगुरुनगर – सकल हिंदूंचे प्रेरणास्थान हृदय विश्राम स्थान आश्रयस्थान असलेले प्रभू रामचंद्र यांच्या प्रकट दिनी ढोल,ताशांच्या गजरात, अत्यंत जल्लोषात व भक्तिमय वातावरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने रामनवमी राजगुरूनगरमध्ये साजरी करण्यात आली. प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची भव्य शोभायात्रेचे आयोजन हिंदुराष्ट्र सेनेने केले होते. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा पार पडली.

यावेळी प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचे पूजन डीवायएसपी श्री सुदर्शन पाटील,शिवसेनेचे गणेश सांडभोर ,खेड तालुका अध्यक्ष आकाश डोळस,खेड पोलिस स्टेशनचे पीआय गुरव, लाड साहेब यांच्या हस्ते शोभायात्रेची आरती घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

यावेळीहिंदु महादेव गणेशकर. राजू सर रौंधळ, अजय शिंदे,रवी कड ,बाबाजी सोंडेकर, अँड. अविनाश बोराडे, सुहास जाधव,रवी काळे, प्रवीण चांभारे, प्रदीप चौरे, बाली कुलकर्णी,या़ंच्यासह राष्ट्र सेनेचे सर्व पदाधिकारी आदी नागरिक उपस्थित होते

Previous articleउरुळी कांचन येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न
Next articleटीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉटिश कड्यावरून मानवंदना