उरुळी कांचन येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

उरुळी कांचन

उरुळी कांचन देवस्थान संस्था व भैरवनाथ सेवा समिती – उरुळी कांचन ग्रामस्थ आयोजित श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह नुकताच संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कीर्तनरुपी सेवा हभप नारायण महाराज काळे, हभप सुखदेव महाराज ननावरे, हभप दत्तात्रय महाराज दोन्हे, हभप वनिताताई पाटील, हभप संभाजी महाराज अपुणे, हभप जीवन महाराज शिंदे, हभप गिरिराज शास्त्री, हभप सोनाली ताई करपे, हभप दत्तात्रय महाराज सुके, हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली. काल्याचे कीर्तन हभप मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे झाले. प्रवचनरुपी सेवा हभप साक्षी बापु पवार, हभप अक्षय महाराज रोडे, हभप नाना महाराज काळे, हभप निर्मलाताई कांचन, हभप सुनिताताई कुंजीर, हभप विनायक महाराज कांचन, हभप गोकुळ महाराज कुंजीर, हभप निताताई कांचन यांनी दिली.

यावेळी माजी सरपंच माऊली कांचन, सरपंच राजेंद्र कांचन, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती कांचन, मा.जि.प.सदस्य महादेव कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, उपसरपंच अनिता बगाडे, मा.सरपंच संतोष कांचन, विश्वस्त युवराज कांचन, हभप सुरेश कांचन, विनोद कांचन, संजय वनारसे, महादेव कांचन, तुकाराम कांचन, तुकाराम जगताप, प्रशांत भोर, संतोष गायकवाड, अनिल ननावरे आदी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत सदस्य, भैरवनाथ सेवा समिती सदस्य, श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य व महिला – ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleउरुळी कांचनमध्ये महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी
Next articleराजगुरूनगर मध्ये हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रा