घोडेगावचे ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या अध्यक्षपदी प्रशांत काळे यांची निवड

घोडेगावनगरीत धार्मिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच्या आग्रस्थानी असणारे प्रशांत किसनराव काळे यांची श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान घोडेगाव या प्राचिन देवस्थानच्या विश्वस्त कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब गणपतराव आनंदराव याची निवड करण्यात आली.यासंस्थानच्या बदल अहवालास माननिय धर्मदाय सहआयुक्त पुणे यांनी मंजुरी दिली आहे.त्यानुसार विश्वस्थ व कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली आहे.

मंडळाच्या कार्यकारणीवर पुढीलप्रमाणे निवड झाली आहे. किरण बबनराव घोडेकर कार्याध्यक्ष, राजेशशेठ कैलासशेठ काळे खजिनदार, नवनाथ बबनराव काळे सचिव, निलेश रविंद्र काण्णव सहसचिव , सखाराम हरिभाऊ काळे , वसंतराव महादेव काळे ,जयसिंग मानाजी काळे , सुरेशशेठ भिमाजीशेठ काळे , शामशेठ गंगाधर होनराव , नितीन विठ्ठराव काळे ( विश्वस्त)

श्री हरिश्चंद्र महादेव हे स्वयंभू शिवलिंग असून श्री राजा हरिश्चंद्राने या ठिकाणी तपश्चर्या करून तपोबलाच्या जोरावर स्वयंभू शिवलिंग प्रकठवले हे शिवलिंग घोडेगाव पंचक्रोशीतील लोकांचे आराध्य दैवत आहे. पुणे-मुंबई बरोबरच देशभरातील अनेक भाविक भक्त श्री क्षेत्र भीमाशंकरकडे दर्शनासाठी येत असतात, श्री हरिश्चंद्र महादेवाचे दर्शन घेतात. श्री आदीगुरु शंकराचार्य, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ,लोकमान्य टिळक यशवंतराव चव्हाण आदींनी श्री हरिचंद्र महादेवाची पूजा केली आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात वार्षिक उत्सव ग्रामस्थ भक्तिभावाने साजरा करतात तसेच तीन वर्षातून येणाऱ्या अधिकमासात
शिवपिंडीच्या खाली असलेल्या मुख्य स्वयंभू शिवलिंगाची महापूजा करुन दर्शनासाठी खुले केले जाते. नुकतेच देवस्थानने जिल्हा परिषदेच्या निधीतून २५ लाख रुपये खर्च करून सभागृह बांधले आहे. तसेच दगडी दीपमालेचे काम पूर्ण केले आहे.

Previous articleखेड ,नारायणगाव, मंचर ,शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या व विकत घेणाऱ्या तिघांवर कारवाई
Next articleउरुळी कांचनमध्ये महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी