उरुळी कांचनमध्ये महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने रामनवमी उत्साहात साजरी

उरुळी कांचन

मर्यादापुरुषोत्तम अयोध्यापती प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उरुळी कांचन येथील महाराजा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने रामनवमी सोहळा नुकताच संपन्न झाला याप्रसंगी श्रीरामांच्या १५ फूट भव्य मूर्तीचे अनावरण करण्यात आले. “जय राम श्री राम जय जय राम” नामघोषाने व विद्युत रोषणाईने परिसर भक्तीमय झाला होता. अवयव दान, रांगोळी स्पर्धा आणि महाप्रसाद यानिमित्ताने महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्यांदा नवीन संकल्पना राबविण्यात आली तसेच उपस्थित मान्यवर यांना शाल देण्याऐवजी वृक्ष देऊन सन्मानित केले. भाजपचे शहर अध्यक्ष – महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित कांचन यांनी याकार्यक्रमाचे नियोजन केले होते

यावेळी सरपंच राजेंद्र कांचन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, क्षेत्रिय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, माजी सरपंच सुदर्शन चौधरी, भाजपा जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, शिवरत्न उद्योग समुहाचे विकास जगताप, सामाजिक कार्यकर्त्या सविता ताई कांचन, भाजपा महिला अध्यक्ष कविता शरद खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, मा.सरपंच संतोष कांचन, शरद वनारसे, मा.उपसरपंच सागर पोपट कांचन, ग्रा.प.सदस्य सुनिल तांबे, समाजिक कार्यकर्ते सुभाष बगाडे, आबासाहेब चव्हाण, आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

यावेळी रांगोळी स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन पूजा सणस, ऋषिकेश शेळके, शुभम वलटे, काजल खोमणे यांनी केले होते. यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक हर्षदा मोहिते, द्वितीय क्रमांक प्रियंका माने, तृतीय क्रमांक मयुरी लोणारी, श्रुति शर्मा, निकीता सोनार तर विशेष प्राविण्य सैफूल शेख यांना रोख पारितोषिक देऊन झाड भेट देण्यात आले. तसेच अवयव दान यासाठीही उत्तम प्रतिसाद मिळाला.

Previous articleघोडेगावचे ग्रामदैवत श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या अध्यक्षपदी प्रशांत काळे यांची निवड
Next articleउरुळी कांचन येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न