टाकळी हाजी येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत पिंपळगाव संघ विजेता

कवठे येमाई(धनंजय साळवे)- टाकळी हाजी येथे उपसरपंच अजितदादा सोनभाऊ गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन मा.आमदार पोपटरावजी गावडे,जि.प.सदस्या सुनिताताई गावडे,घोडगंगा कारखाना संचालक राजेंद्र गावडे,राष्ट्रवादी युवा नेते संदीप गायकवाड,लोकमतचे पत्रकार संजय बारहाते,शिरुर तालुका व्हाॅलीबाॅल अध्यक्ष बाबाजी गावडे,सचिव अमोलशेठ शिंदे,पारनेर तालुका व्हाॅलीबाॅल अध्यक्ष रावसाहेब वराळ यांच्या हस्ते करण्यात आले.अतिशय चुरशीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत

प्रथम क्रमांक :- पिंपळगाव खडकी

दुसरा क्रमांक :- ढवळपुरी

तिसरा क्रमांक :- कवठे येमाई

चतुर्थ क्रमांक :- निघोज या संघांनी मिळविला.या स्पर्धेत गहीनी बीडकर,अल्ताफ,हनुमंत भोसले,सप्रेसर,गणेश वळसे,विजय बगाटे,मंदीलकर,तानाजी विश्वासराव,निघोजचे वराळ,मंदीलकर,बारकुशेठ,वाखारेपाटील, यांनी उत्कृष्ठ खेळ केला.या स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग नोंदविला.अंतिम सामना पिंपळगाव विरुध्द ढवळपुरी हा झाला.उपांत्य सामन्यात कवठे व निघोज हे संघ गेले होते.बक्षीस वितरण उपसरपंंच अजितगावडे किर्हेसर,उपसचिव कुंडलिक उचाळे, यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या संघांचे शिरुर तालुका अध्यक्ष बाबाजी गावडे,उपाध्यक्ष सायकरतात्या,मा.अध्यक्ष आनंदराव फडतरेमामा,सचिव अमोल शिंदे, पारनेर तालुका अध्यक्ष रावसाहेबदादा वराळ,सचिव सुधिरशेठ वाखारे,शिरुर तालुका युवा सरचिटणीस पवनराजे जाधव,युवानेते विठ्ठल जाधव,पुणे जिल्हा शुटींग व्हॉलीबॉल अध्यक्ष राजुशेठ गावडे या सर्वांनी अभिनंदन केले.

Previous articleस्व. मंगेशशेठ दोशी यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर
Next articleखेड ,नारायणगाव, मंचर ,शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या व विकत घेणाऱ्या तिघांवर कारवाई