स्व. मंगेशशेठ दोशी यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर

योगेश राऊत

पाटस ,(ता. दौंड) येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश शेठ दोशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिननिमित्त रविवार ( दि.१०) रोजी नागेश्वर मित्र मंडळ व मंगेश शेठ दोशी मित्र मंडळ यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते.

या रक्तदान शिबिरात 86 बाटल्या रक्त संकलित झाल्या. मुख्यत्वे करून या शिबिराला युवा वर्गाने उस्फूर्तपणे रक्तदान केले. मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग रक्तदान करण्यास उपस्थित होता. विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी या शिबिरास भेट दिली. पुढील काळातही रक्तदान शिबिर घेऊन जास्तीत जास्त रुग्णांना याचा उपयोग होईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी बापू ढमाले यांनी दिली.या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले .

या वेळी पाटसचे सरपंच अवंतिका शितोळे ,बाबासाहेब शितोळे ,नितीनभाऊ दोरगे ,दिलीपभाऊ हंडाळ ,नागेश्वर मित्रमंडळ अध्यक्ष शिवाजीबापू ढमाले ,सागर शितोळे , अण्णा तांबे ,मिलिंद दोशी ,राजू शिंदे ,नितीन देशमुख ,लहू खाडे ,विनोद भोसले ,समाधान शिंदे ,जाकीरभाई तांबोळी ,सायराबानू शेख , स्वप्निल भागवत ,पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे , मनोज फडतरे ,शहाजी चव्हाण ,बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते .

Previous articleखाद्यतेल अजुन महागणार.
Next articleटाकळी हाजी येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत पिंपळगाव संघ विजेता