खाद्यतेल अजुन महागणार.

कवठे येमाई – खाद्य तेल होणार आणखी महाग ! – पहा काय आहे कारण ?

तसे तुम्हाला माहिती असेल , खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे उत्तरेकडील पाच राज्ये वगळून देशभरात , १ फेब्रुवारीपासून खाद्यतेल तसेच तेलबियांच्या साठ्यावर मर्यादा घालण्यात आली होती

 

⚡ मात्र आता उत्तरेकडील पाच राज्येही १ एप्रिलपासून साठा मर्यादेच्या कक्षेत आणली आहेत – मात्र त्यामुळेही दरवाढीवर लगाम लागण्याची चिन्हे नाहीत

 

📝 तसेच आता सर्व राज्यांत तेलबिया, तेल साठ्यावरील मर्यादा डिसेंबर २०२२ पर्यंत लागू राहणार आहे – असे केंद्र सरकारने सांगितले

 

🤷‍♂️ *पहा काय आहे कारण ?*

 

🔰 तसे दरवर्षी भारत ३० लाख टन सूर्यफूल तेल आयात करते – त्यापैकी ७० टक्के सूर्यफूल तेलाची आयात एकट्या युक्रेनमधून होते – मात्र आता रशिया-युक्रेन युद्धामुळे सूर्यफूल तेलाची आयात कमी झाली आहे

 

🔰 याव्यतिरिक्त सोयाबीन तेलाची आयात अर्जेटिना, ब्राझील तसेच अमेरिकेतून होते तेथील , मात्र यावर्षी हवामानातील बदलामुळे सोयाबीनची लागवड कमी झाली असून सोयाबीन तेलाची आवक अपुरी पडत आहे

 

🔰 त्यामुळे मार्च महिन्यात स्थिरावलेले तेलाचे दर येत्या काही दिवसांत पुन्हा वाढणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांनी दिले आहेत

 

 

 

 

Previous articleमहात्मा फुले यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – सरपंच मिनाक्षीताई म्हेत्रे
Next articleस्व. मंगेशशेठ दोशी यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर