महात्मा फुले यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – सरपंच मिनाक्षीताई म्हेत्रे

दौंड – तालुक्यातील सहजपूर येथे महिला शिक्षण प्रणेते – समाजसेवक सुधारक – शेतकऱ्यांचे कैवारी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सहजपूर ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन आदरणीय नवनिर्वाचित विद्यमान सरपंच मिनाक्षीताई चांगदेव म्हेत्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.

यावेळी मा उपसरपंच सिताराम वेताळ, सदस्य प्रदीपदाजी गायकवाड,मा सरपंच चांगदेवदादा म्हेत्रे, ग्रामसेविका बाचकर मॅडम, सदस्य सागरजी माकर, सदस्या अर्चनाताई म्हेत्रे, सदस्या सारिकाताई कांबळे, भाऊ माकर, बापूजी टेळे, कर्मचारी गणेश मोडक, सुनिल म्हेत्रे,शिलाबाई नेटके तसेच मी सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे तसेच उपस्थित मान्यवर उपस्थित होते .

यावेळी नवनिर्वाचित सरपंच मिनाक्षी म्हेत्रे व मा. उपसरपंच सिताराम वेताळ यांनी महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल उजाळा दिला आहे. सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे म्हणाले- महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शोक्षित पिडीत महिलांना शिक्षण मिळाले त्यावेळी महिलांना शिक्षण देत आहे म्हणून उच्चवर्णीय, ब्राम्हण लोक रस्त्याने जात असताना त्यांच्या अंगावर शेण- चिखल फेकत असत तरीही त्या त्रासाला कंटाळून न जाता त्यांनी आपले कार्य तसेच पुढे चालू ठेवले होते, छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथे समाधी शोधून काढली होती भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली होती, शेतकऱ्यांचे कैवारी, नावाजलेले शासकीय ठेकेदार म्हणून खडकवासला धरण फुलेंनी बांधले आहे अशा या महापुरुषांच्या स्मृतींना पुन्हा विनम्र अभिवादन करतो .

Previous articleवारंवार होणारे अघोषित भारनियमन व निकृष्ट कामाबाबत दौंड शहर काँग्रेसच्या वतीने महावितरणला निवेदन
Next articleखाद्यतेल अजुन महागणार.