वारंवार होणारे अघोषित भारनियमन व निकृष्ट कामाबाबत दौंड शहर काँग्रेसच्या वतीने महावितरणला निवेदन

कुरकुंभ , सुरेश बागल

दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभियंता महावितरण दौंड येथे वारंवार होणाऱ्या अघोषित भारनियमन व निकृष्ट कामाबाबत निवेदन देण्यात आले . कामाच्या वेळेस लाईट नसल्या कारणाने सर्वसामान्य जनतेचे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान कोण भरून काढणार असा प्रश्न शहर काँग्रेस कमिटीला पडला आहे

.
दौंड शहरात कामाच्या नावाने होणारे अघोषित भारनियमन त्वरित बंद करण्यात यावे. तसेच वीज दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची निकृष्टता तपासून उच्च व शासन मान्य दर्जाचे साहित्य वापरण्यात यावे .शहर भागात विविध समस्या निर्माण झाल्यास इतर भागातील वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणे प्रत्येक भागात जोडणी हवी तसेच वीज समस्या व उपाय निवारण्यासाठी स्थानिक नागरिक व अधिकारी वर्गाची एक समिती स्थापन करण्यात आली पाहिजे. दर एक ते दोन महिन्याला सदर समितीची बैठक घेण्यात यावी निवेदनात नमूद केलेले सर्व विषय यासंबंधात लवकरात लवकर कामे करावी अन्यथा दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी निवेदन देताना तन्मय पवार,जिल्हाध्यक्ष पर्यावरण कॉंग्रेस श्रेयस मुनोत,तालुकाध्यक्ष युवक कॉंग्रेस हरेष ओझा,शहराध्यक्ष दौंड शहर रज्जाक भाई शेख,शहराध्यक्ष अल्पसंख्यक कॉंग्रेस विठ्ठल शिपलकर,सरचिटणीस दौंड शहर कॉंग्रेस अतुल जगदाळे,मा अध्यक्ष युवक कॉंग्रेस क्षिरसागर ,थोरात व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleमहाळूंगे पडवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक क्षयरोग दिन साजरा
Next articleमहात्मा फुले यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – सरपंच मिनाक्षीताई म्हेत्रे