महाळूंगे पडवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक क्षयरोग दिन साजरा

महाळुंगे पडवळ -प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंगे पडवळ आणि पंचायत समिती आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा डॉ. सुरेश ढेकळे तालुका आरोग्य अधिकारी व डॉ तुषार पवार, डॉ सुधीर वाघमोडे डॉ सिंधू डाकवले ( वैद्यकीय अधिकारी) यांच्या उपस्थिती मध्ये जागतिक क्षयरोग दिन आयोजन करण्यात येऊन त्या निमित्त हुतात्मा बाबू गेनू विद्यालय, महाळूंगे पडवळ, येथे श्रीम सुषमा भागवत (STS) आणि श्री संतोष बोऱ्हाडे (STLS) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना क्षयरोग लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध या विषयी उत्तम मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमा निमित्त भास्कर साबळे,दत्तात्रय भागवत यांच्या नेतृत्वाखाली जागतिक क्षयरोग दिन निमित्ताने गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी क्षितिजा शिंदे, कविता थोरात (आरोग्य सेविका)आणि सर्व आशा स्वयंसेविका महाळुंगे पडवळ यांनी सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमांध्ये विद्यालयातील, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, हुतात्मा बाबू गेनू विद्यालय, महाळुंगे पडवळ यांचे उत्तम सहकार्य लाभले.

Previous articleसरकारी व कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी
Next articleवारंवार होणारे अघोषित भारनियमन व निकृष्ट कामाबाबत दौंड शहर काँग्रेसच्या वतीने महावितरणला निवेदन