सरकारी व कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी

नारायणगाव : (किरण वाजगे)

वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कामगाराने स्वतः वीज चोरी करून इतरांना देखील वीज चोरी करण्यास मदत केल्याची तक्रार स्थानिक वायरमनने केल्यानंतर या गोष्टीचा राग मनात धरून वरिष्ठ अधिकाऱ्यां समोरच कंत्राटी कामगारांने वायरमनला शिवीगाळ, धक्काबुक्की केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत वायरमन तथा वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास विठ्ठल बांबळे यांनी नारायणगाव पोलिस स्थानकात तक्रार देखील दिली आहे.
वीज बिलाची थकबाकी असताना बेकायदेशीर वीज कनेक्शन देणे, आपल्या कार्यक्षेत्रात परस्पर वीज मीटर बसवणे, नवीन कनेक्शन सर्वे रिपोर्ट वर बेकायदा सही करणे तसेच स्वतः वीज चोरी करणे अशी तक्रार वायरमन बांबळे यांनी सुनील जाधव या कंत्राटी कामगार विरोधात वरिष्ठांकडे केली होती. त्यानुसार वीज वितरण चे नारायणगाव शहरचे प्रभारी सहाय्यक अभियंता ऋषिकेश बनसोडे व दत्ता जाधव यांच्यासमोरच वायरमन व कंत्राटी कामगारांची जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या आवारात शनिवारी (दि.९) रोजी दुपारी ०१ वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ व हाणामारी झाली.विजवितरण च्या अधिकाऱ्यांसमोरच वायरमन व कंत्राटी कामगार यांच्यामध्ये झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आधीच भारनियमनाचा व शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या विज बिलाचा घोळ सर्वत्र दिसत असतानाच नारायणगाव ला झालेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या या मारहाणीची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.
याप्रकरणी सुनील भाऊ जाधव याच्या विरोधात वायरमन रामदास बांबळे यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

Previous articleराष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या कु.स्वप्नाली तांबे हिचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान
Next articleमहाळूंगे पडवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक क्षयरोग दिन साजरा