राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या कु.स्वप्नाली तांबे हिचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान

उरुळी कांचन

येथील कु.स्वप्नाली रतन तांबे हिने उदयपुर राजस्थान येथे झालेल्या २१ व्या राष्ट्रीय पॅरा स्वीमिंग चॅम्पियनशीप २०२१-२०२२ स्पर्धेमध्ये १ सुवर्ण पदक, २ रौप्य पदक मिळवले असल्याने तिच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सत्कार करुन कौतुक केले व शासना मार्फत काही सहकार्य लागले तर करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी पु. जि.नि.स.सदस्य संतोष आबासाहेब कांचन, ग्रा.प.सदस्य सुनिल तांबे, रतन तांबे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हुतात्म्यांना ११ नद्यांचा जलाभिषेक
Next articleसरकारी व कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी