भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हुतात्म्यांना ११ नद्यांचा जलाभिषेक

राजगुरूनगर -भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षा निमित्त आज राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव स्मृती स्थळ बसस्थानक येथे तिन्ही हुतात्म्यांच्या शिल्पास महाराष्ट्रातील ११ नद्यांच्या पाण्याचा व दुधाचा अभिषेक ,पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती महाराष्ट्र तसेच हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव न्यास राजगुरूनगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
समितीचे अध्यक्ष संपतराव जाधव सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.यावेळी राज्यातील सामाजिक कार्यकर्ते यांचा हुतात्मा राजगुरू पुरस्कार तसेच काही कार्यकर्त्यांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी अमुत महोत्सव समिती उपाध्यक्ष नाशिक येथील प्रमीला थविल,जुन्नर येथील कैलास जेजुरकर,हृषिकेश थविल ,जयसिंग लोखंडे,यांसह ठाणे,ओतूर,येथून अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन संस्थापक कैलास दुधाळे ,अध्यक्ष ऍड.मनीषा ताई पवळे, अमर टाटिया,दिलीप होले,
हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव न्यास अध्यक्ष मधुकर गिलबिले ,हुतात्मा राजगुरू मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल पाचारणे आदी उपस्थित होते.

Previous articleभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हुतात्म्यांना ११ नद्यांचा जलाभिषेक
Next articleराष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या कु.स्वप्नाली तांबे हिचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान