नारायणगाव विकास सोसायटीच्या वतीने पीक कर्ज वाटप

नारायणगाव : किरण वाजगे

उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नारायणगाव विकास सोसायटीच्या पीक कर्ज वाटपास आज शुक्रवार दि. ०८ पासून सुरवात करण्यात आली.नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताई देवीचा आशीर्वाद घेऊन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात कर्ज वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक संजय काळे, विभागीय अधिकारी सुभाष कवडे, बाळासाहेब मुरादे, वसुली अधिकारी सुनील ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे अध्यक्ष संतोषनाना खैरे, उपाध्यक्ष किरण वाजगे, बँकेचे विकास अधिकारी प्रसाद कोल्हे, शाखाधिकारी जयमाला काळे यांच्या हस्ते शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच योगेश पाटे, राजेंद्र मेहेर, माजी सरपंच अशोक पाटे, एकनाथ शेटे, डी के भुजबळ, माजी उपसरपंच संतोष वाजगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, आशिष फुलसुंदर, जंगल कोल्हे, सुजित डोंगरे, निलेश गोरडे, सोसायटीचे सचिव गणेश गाडेकर तसेच सभासद शेतकरी खंडू मेहेत्रे, तानाजी वाजगे, श्रीमती माताडे, ज्ञानेश्वर मेहेत्रे, जयेश कोकणे, गणेश मेहेत्रे, संदीप वारुळे, भागेश्वर डेरे व सोसायटीचे संचालक चंद्रकांत बनकर, कैलास डेरे, रामदास तोडकरी, मारुती काळे, अरुण कोल्हे, संजय खैरे, विकास फुलसुंदर, राजेंद्र पाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान मागील वर्षांमध्ये संस्थेची मार्चअखेर बँक पातळीवर १०० % वसुली झाली आहे. सन २०२२-२०२३ साला करता खरीप हंगामासाठी संस्थेच्या माध्यमातून सहाशे सभासदांसाठी सुमारे पाच कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे.

यापुढील काळात सभासदांना विविध प्रकारची मध्यम व दीर्घ मुदत तसेच आवश्यक प्रकारची सर्व कर्ज वाटप करून आर्थिक सहाय्य करण्यात येईल अशी माहिती यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष संतोषनाना खैरे व उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी दिली.

Previous articleकवठे विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व.
Next articleअवैध्य गोवंक्षाची वाहतुक करणाऱ्या गाडी मालकाचा खेड न्यायालयाने अर्ज फेटाळला