कवठे विविध कार्यकारी सोसायटीवर शिवसेनेचे वर्चस्व.

कवठे येमाई (धनंजय साळवे)- कवठे येमाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित च्या चेअरमन पदी विक्रम मळीभाऊ इचके व व्हॉ. चेअरमन पदी बबन गंगाराम वाघदरे यांची निवड झाली .हे दोन्ही उमेदवार शिवसेना पुरस्कृत पॅनलमधुन निवडुन आले होते. त्यामुळे ह्या सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.हि सोसायटी शिरुर तालुक्यातील मोठ्या सोसायटी पैकी एक असल्यामुळे ह्या विजयाला वेगळे महत्व आहे.सहकार क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना हळुहळू आपले पाय रोऊ लागले आहेत त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी आगामी निवडणुका पहाता निश्चित वाढणार आहे.विजयी उमेदवारांचे मा.खासदार शिवाजी आढळराव,पं.सदस्य राजाराम बाणखेले,पं.सदस्य डॉ.सुभाष पोकळे,मा.सरपंच बबनराव पोकळे सरपंच रामभाऊ सांडभोर,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,मा.उपसरपंच  निखिल घोडे यांनी अभिनंदन केले.

Previous articleमाजी विद्यार्थ्यांनी शाळेला बांधून दिला तीन लाखाचा व्हरांडा
Next articleनारायणगाव विकास सोसायटीच्या वतीने पीक कर्ज वाटप