अवैध्य गोवंक्षाची वाहतुक करणाऱ्या गाडी मालकाचा खेड न्यायालयाने अर्ज फेटाळला

राजगुरूनगर- जुन्नरच्या कसायांचा हस्तक म्हणून खेड,आंबेगाव,जुन्नर तालुक्यातील मावळ भागात पाय रोवून कत्तलीसाठी जनावरे पुरवणारा मुख्य सप्लायर प्रथमेश नथू उगले (रा.उगलेवाडी, शिनोली, ता.आंबेगाव) याने या व्यवसायासाठी वारंवार वापरलेली त्याची अशोक लेलैंड गाडी सोडण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता.

याच्या विरोधात जय गोमाता प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ गो शाळेतर्फे मानद पशु कल्याण अधिकारी तथा अध्यक्ष बाळासाहेब शंकर कौदरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अर्जदाराच्या वकिलांचा तसेच गो शाळेतर्फे ॲडव्होकेट निलेश आंधळे यांचा युक्तिवाद ऐकून मे.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती आर.डी. पतंगे यांनी प्रथमेश उगले याचा गाडी सोडण्याचा अर्ज फेटाळून लावला. हा आणि असे सर्व निकाल कसायांना जोरदार चपराक ठरणार असून न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

Previous articleनारायणगाव विकास सोसायटीच्या वतीने पीक कर्ज वाटप
Next articleआळे गावात आढळली बिबट्याची पिल्ले ; ऊसतोड मजुरांनी ऊसतोडणी केली बंद