डिंग्रजवाडीचे समीर गव्हाणे राज्यस्तरीय क्रीडा गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत

गणेश सातव,वाघोली

मानव अधिकार फाउंडेशन भारत व मृत्युंजय फाईट क्लब इंडिया यांच्या वतीने डिंग्रजवाडी येथील समीर रामदास गव्हाणे यांना राज्य स्तरीय क्रीडा गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समीर गव्हाणे यांची क्रीडा क्षेत्रातील आजवरची कारकीर्द पाहून त्यांना हा पुरस्कार दिल्याचे मानवाधिकार फाउंडेशन चे राष्ट्रीय सचिव व प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर यांनी सांगितले.

यावेळी मानवाधिकार फाउंडेशन चे राष्ट्रीय सचिव व प्रदेश अध्यक्ष प्रमोद फुलसुंदर, महाराष्ट्र राज्य महासचिव सोनी गोडसे, जगन्नाथ आल्हाट, डॉ रविकिरण शहा, सुरेश भुजबळ, पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संरक्षण उपाध्यक्ष धनराज जगताप,ज्ञानेश्वर फुलसुंदर, उत्तम भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन तोडकर,सागर दरेकर, काळुराम ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

समीर गव्हाणे यांना पुरस्कार मिळाल्यांनतर पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल नरहरी गव्हाणे, उपसरपंच बाप्पूसाहेब मल्हारी गव्हाणे, पुणे जिल्हा माहिती सेवा समिती अध्यक्ष लक्ष्मण गव्हाणे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

“समीर गव्हाणे यांची आजपर्यंत ची दैदिप्यमान कारकीर्द”.

?फिनिक्स मार्केट सिटी यांच्या वतीने फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांक
?पुना गाडगीळ यांच्या वतीने महाराष्ट्र अक्षर लेखन स्पर्धेत दुसरे बक्षीस
?पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या वतीने विशेष कौतुकाची थाप.
?मराठी फिल्म फेस्टिवल मध्ये अभिनेता सुभोध भावे यांच्या वतीने सन्मान
?सकाळ वारी फोटोग्राफी मध्ये दैदिप्यमान यश
?ऑनलाईन फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम क्रमांक
?कराटे स्पर्धे मध्ये असंख्य मेडल
?स्वातंत्र्य सैनिक, अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते, मित्रपरिवार यांची विविध १०० स्केच तयार

आजतागायत क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामाची पोच पावती पुरस्काराच्या रूपाने मिळाली आहे. पुरस्कार मिळाल्याने पुढील काळात काम करण्यास उत्साह व प्रोत्साहन मिळणार आहे. आज मिळालेला राज्य स्तरीय क्रीडा गुणगौरव पुरस्कार आई वडील व क्रीडा क्षेत्रातील माझ्या गुरुजनांना समर्पित करत आहे अशी प्रतिक्रिया गव्हाणे यांनी दिली.

Previous articleकवठे व्हाॅलीबाॅल लीगमध्ये विजय बगाटे सेव्हन स्टार संघ विजेता
Next articleपाटस येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद