कवठे व्हाॅलीबाॅल लीगमध्ये विजय बगाटे सेव्हन स्टार संघ विजेता

कवठे येमाई (धनंजय साळवे) – कवठे येमाई येथे खेळल्या गेलेल्या व्हाॅलीबाॅल लीगमध्ये विजय बगाटे सेव्हन स्टार हा संघ विजेता ठरला.ह्या संघाने अंतिम सामन्यामध्ये पवनराजे जाधव सुपर सेव्हन संघाचा पराभव केला .अंतिम सामना अतिशय चुरशीचा झाला सामन्यावर प्रथम पवनराजे जाधव सुपर सेव्हन संघाचे वर्चस्व होते परंतु विजय बगाटे यांनी आपला खेळ उंचावत विजय आपल्या कडे खेचुन आणला.ह्या स्पर्धेत श्रीराम इचके ,मयुर रेणके,अमोल शिंदे,तेजस काळे,संदीप ईचके,राजु मुंजाळ,अतिकुर,अक्षय गोसावी यांनी चांगला खेळ केला.बक्षीस वितरण महाराष्ट्र पोलीस मयुर काळेसाहेब व शिवसेना नेते शंकर उर्फ बबुशेठ इचके यांच्या हस्ते झाला.विजेत्या व उपविजेत्या संघाचे शिरुर तालुका व्हाॅलीबाॅल संघटनेचे अध्यक्ष बाबाजीशेठ गावडे यांनी अभिनंदन केले.

Previous articleग्रामीण भागाच्या शाश्वत विकासात सामाजिक अंतर्भाव महत्वाचा — सौ.सुनेत्रा पवार
Next articleडिंग्रजवाडीचे समीर गव्हाणे राज्यस्तरीय क्रीडा गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत