पाटस येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

योगेश राऊत ,पाटस

‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. दौंड तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये व काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे.तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून व रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रहारच्या वतीने पाटस येथील श्री . दत्त मंदीरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पाटस आणि पाटस परीसरातील अनेक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला होता . या रक्तदान शिबिरात ६१ बाटल्या रक्त संकलीत झाल्या .

दौंड तालुक्याचे सरचिटणीस शैलेश शिपलकर ‘उपाध्यक्ष रफिकजी सय्यद ,शंकर काळे सर दौंड तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा शबाना मुलाणी ,चिटणीस डॉ.राहुल शेलार युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल दोरगे ,प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जामले वकील आघाडीचे अध्यक्ष अँड .नानासाहेब साखरे ,दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप , प्रहार कामगार आघाडीचे अध्यक्ष प्रमोद शितोळे ,तुषार ढवान , राज मुलाणी ‘नंदकुमार भागवत , प्रशांत ठोंबरे ,सलीम तांबोळी ,रोहीणी शितोळे तसेच मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleडिंग्रजवाडीचे समीर गव्हाणे राज्यस्तरीय क्रीडा गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत
Next articleमाजी विद्यार्थ्यांनी शाळेला बांधून दिला तीन लाखाचा व्हरांडा