उरुळी कांचन मध्ये पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग

उरुळी कांचन

संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी मोठ्या उत्साहाने हिंदू नववर्ष आणि मराठी संस्कृती मधला पहिला सण गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असताना उरुळी कांचन मध्ये महिला, तरुणी, बालिका, विद्यार्थिनींनी मोठ्या जल्योशात पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढून मराठी संस्कृतीचा, अस्मियतेचा, स्त्रीशक्तीचा आणि आपल्या परंपरेचा एक आदर्श उरुळी कांचन प्रस्थापित केला. “आपण सगळेजण धर्माचे जाणकार नसले तरी चालेल, पण आपल्या सगळ्यांना धर्माची जाण” असायला पाहिजे, हा मूळ हेतू सिद्ध करुन मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम पार पाडून कोणत्याही पक्षासाठी नाही, कोणत्याही व्यक्तीसाठी नाही तर आपल्या सर्वांच्या मागे पडत चाललेली संस्कृती जपण्यासाठी सर्व महिला संघटित होऊन शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली.

गुढीपाडवा शोभायात्रेचा नियोजनामध्ये प्रामुख्याने पूजा सणस, सविता कांचन, ज्योती झुरंगे, अजिंक्य कांचन, विकास जगताप, श्रीकांत कांचन, निखिल कांचन, भाऊसाहेब कांचन, अर्चिस वाडेकर, सुमित वनारसे, आबासाहेब चव्हाण, ओंकार कांचन आदी कार्यकर्ते सहभागी होते.

याप्रसंगी सविता कांचन, पुजा सणस, सायली कांचन, ज्योती झुरंगे, सारिका मुरकुटे, रुपाली कांचन, सीमा जगताप, नंदिनी मुरकुटे, सुरेखा कांचन, स्वाती चौधरी, वैशाली कड, वृशाली कांचन, दिपाली दरेकर, वैशाली गोळे, दिपाली कांचन, शीतल जाधव यांच्यासह शोभायात्रेमध्ये किमान सव्वाशे ते दीडशे महिलांचा सहभाग होता.

Previous articleइंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेनेचे मंचरमध्ये “थाळी वाजवा” आंदोलन
Next articleराज्यातील २२ हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर ; कामकाजावर परिणाम