राज्यातील २२ हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर ; कामकाजावर परिणाम

उरुळी कांचन

राज्यभरातील महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारल्याने जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय ओस पडली असून नागरिकांच्या कामाचा खोळंबा झाला असून शासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.शासनस्तरावर महसूल कर्मचा-यांच्या मागण्या प्रलंबित असून त्याची दखल न घेतल्याने राज्यातील सर्व नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक, शिपाई व कोतवाल महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष दिपक चव्हाण यांनी दिली.

नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरुन २० टक्के करावे. महसूल विभागात सहायकांची रिक्त पदे तातडीने भरावीत. पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालमार्यादित पार पाडावी. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० रुपये करावा. २७ नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती करताना महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करावी. प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-३ पदावर पदोन्नती द्यावी या मागण्यांसाठी आज राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूलच्या २२ हजार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.

याबाबत पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की महसूल प्रशासनातील रिक्त पदांची तत्काळ भरती करावी, अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून, दोन वर्षांपासून थांबलेली नायब तहसीलदार पदोन्नती करावी,नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे. प्रत्येक तालुक्यास खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करावे. पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वर्ग-3 पदावर पदोन्नती द्यावी इत्यादी मागण्यांसाठी बेमुदत संपावर ठाम आहोत. मागील अनेक दिवसांपासून रिक्त पदाची भरती करण्याची मागणी होत आहे, तर ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध होत नसल्याने दोन वर्षांपासून नायब तहसीलदारांना पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. २८ मार्चला महसूल कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण करून देखील शासनाने दखल न घेतल्याने, आजपासून राज्यभर महसूल कर्मचारी संपावर गेलेत. या संपाचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, महसूल विभागाचे काम ठप्प झाले आहे…दरम्यान मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Previous articleउरुळी कांचन मध्ये पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
Next articleमहाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं… नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही – महेश तपासे