इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेनेचे मंचरमध्ये “थाळी वाजवा” आंदोलन

मंचर- केंद्र सरकारने केलेल्या अमानुष इंधन दरवाढीच्या निषेधार्थ भाजपचे अभिनंदन करण्यासाठी युवासेनेचे मंचरमध्ये जोरदार थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले.युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथे केंद्र सरकारने केलेल्या अमानुष इंधन दरवाढीच्या विरोधात अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत ( दि.३) रोजी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले.

युवासेना राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा जोरदार निषेध केला. महागाई मुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही भाजप मात्र  इतर राज्यातील निवडणुकीत मिळालेला विजय साजरा करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी युवासैनिक व युवतींनी इंधन दरवाढ लादणाऱ्या भाजप सरकारचे  प्रतिकात्मक अभिनंदन करून नागरिकांच्या भावनांचा केंद्र सरकारने विचार करावा व इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी जोरदार मागणी थाळी वाजवत केली.

या आंदोलनात युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी कल्पेश आप्पा बाणखेले, युवासेना तालुका युवा अधिकारी वैभव पोखरकर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सौ.मालती थोरात, युवती सेनेच्या सौ.निलम गावडे, युवासेना तालुका चिटणीस काळूराम लोखंडे, युवासेना तालुका समन्वयक सुनिल गवारी, रोहन कानडे, युवासेना मंचर शहर युवा अधिकारी माऊली लोखंडे, युवासेना विभाग युवा अधिकारी स्वप्निल हिंगे, नविन भागवत, बजरंग देवडे, अक्षय भोर, सुनिल गोरडे, गणेश टेमकर यांच्यासह मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी व युवासैनिक सहभागी झाले होते.

Previous articleसहजपूरच्या सरपंचपदी मिनाक्षीताई म्हेत्रे
Next articleउरुळी कांचन मध्ये पाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग