सहजपूरच्या सरपंचपदी मिनाक्षीताई म्हेत्रे

कुरकुंभ : सुरेश बागल

सहजपूर (ता-दौंड ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमदार राहुल कुल समर्थक मिनाक्षीताई चांगदेव म्हेत्रे यांची निवड झाली मा.आमदार रमेश थोरात गटाच्या सरपंच स्वाती अविनाश होले यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. सरपंचपदासाठी जयमल्हार ग्रामविकास पॅनेलकडून मिनाक्षी चांगदेव म्हेत्रे आणि रायरेश्वर जनसेवा पॅनेलकडून अर्चना विठ्ठल म्हेत्रे यांनी अर्ज दाखल केले यांमध्ये मिनाक्षी चांगदेव म्हेत्रे यांना ६ तर अर्चना विठ्ठल म्हेत्रे यांना ५ मते मिळाली मिनाक्षी चांगदेव म्हेत्रे एक मतांनी विजयी झाल्या.

यावेळी चांगदेव म्हेत्रे, जीवन म्हेत्रे, बापूसाहेब मेहेर, सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे, राजूशेठ पांगारकर,मनोज म्हेत्रे, सिद्धार्थ गजधने, सिताराम वेताळ, प्रदीप गायकवाड,सागर माकर,छबन माकर, चांगदेव थोरात, शिवाजी म्हेत्रे, कुलदीप म्हेत्रे, महेश म्हेत्रे, प्रकाश मगर,सुशिल कांबळे, गालिब सोलापुरे,भाऊ जांभूळकर, स्वप्निल दरेकर आदी उपस्थित होते रायरेश्वर जनसेवा पॅनेलकडून यशवंत कारखाना मा संचालक सुनील दरेकर, या उपसभापती सुशांत दरेकर व जिल्हा परिषद मा सदस्य मोहन म्हेत्रे यांनी भरपूर प्रयत्न केले तरीही शेवटी त्यांना पराभव पत्करावा लागला या घडामोडी घडण्यासाठी जयमल्हार ग्रामविकास पॅनेलकडून किंगमेकर म्हणून जीवन म्हेत्रे व छबन माकर यांनी चांगले काम केले आहे त्याच्याबद्दल परिसरातील गावांमध्ये चांगली चर्चा चालू आहे मा सरपंच चांगदेव खंडेराव म्हेत्रे हेही १० वर्षांपूर्वी सरपंच होते आता त्याच्या पत्नी सरपंच मिनाक्षी चांगदेव म्हेत्रे ह्याही सरपंच झालेल्या आहेत तरीही नवरा बायको सरपंच झाल्याने दौंड, हवेली तालुक्यात या निवडीने चर्चा सुरू आहे .

उमेश म्हेत्रे म्हणाले – गावातील जेष्ठ लोक आपल्या राजकारणासाठी गावातील मुलांना शब्द देतात पण राजकारण झाले की ज्यांनी आपल्यासाठी त्याग केला आहे त्यांना विसरुन जातात का त्यांना आमच्यासारखी हुशार मुले पुढे आलेली चालत नाही का त्यांना फक्त चटया, घोंगड्या हतरणारी लोक लागतात तसेच मागील 5 वर्षातील सरपंच पदाच्या फसवाफसवीने त्यांच्या गटांत निवडून आलेलेही नाराज झाले आहेत तरीही कालच्या सरपंच पदांमुळे लोकांमध्ये स्वाभिमानी निर्माण झाला आहे तरीही मला एवढेच सांगायचे आहे की राजकारणात कोणीही हुरळून जाऊ नये ही नम्र विनंती सरपंच मिनाक्षीताई म्हेत्रे म्हणाल्या – गावातील लोकांना आरोग्य, पाणी, रस्ते, शिक्षण गोरगरिबांची छोटी मोठी कामे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे

Previous articleश्रीक्षेत्र ओझरला जाणारा रस्ता शेतकऱ्यांनी केला बंद
Next articleइंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवासेनेचे मंचरमध्ये “थाळी वाजवा” आंदोलन