ई-पॉस मशिन तांत्रिक अडचणी दुर करण्याबाबत शिरुर तहसिलदारांना रेशन दुकानदार संघटनेकडून निवेदन

कवठे येमाई (धनंजय साळवे)- संपुर्ण राज्य व शिरुर तालुक्यात ई-पॉस मशिनवर धान्य वितरणामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने त्याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास ई-पॉस मशिन तहसिल कार्यालयात जमा करण्यात येतील अशा प्रकारचे निवेदन शिरुर तहसिलदारांना शिरुर तालुका रास्तभाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवाना धारक संघटनेकडून देण्यात आले.
महाराष्ट्रात व शिरुर तालुक्यात आधार सर्व्हरला तांत्रिक समस्यांवर व आधार संलग्न सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत NIC नवी दिल्ली व हैद्राबाद येथील सर्व्हरवर तीन महिन्यापासून अतिरिक्त ताण येत असल्यामुळे धान्य वितरण विस्कळीत झाले आहे.त्यामुळे रेशन दुकानदारांना नागरीकांच्या नाहक असंतोष व रोषाला सामोरे जावे लागत आहे.ई-पॉस मशिन कालबाह्य झाल्या आहेत .ह्या मशिन टुजी तंत्रज्ञानावर आधारीत आहेत सध्या फोरजी तंत्रज्ञान आहे व फायुजीच्या चाचण्या चालु आहे.तसेच या मशीनच्या ब़ॅटर्या खराब होत आहे. त्यामुळे नविन ई-पॉस मशिन नविन फायुजी सह देण्यात याव्यात .याबाबत ठोस निर्णय न झाल्यास ह्या मशिन तहसिल कार्यालयात जमा करुन राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संघटनेकडून देण्यात आला.

Previous articleपाटस ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग निधीसह वजन काटे साऊंड सिस्टिमचे वाटप
Next articleथिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी चे प्रा.अमोल शहा यांच्याकडुन पाबळ महाविद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन