थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी चे प्रा.अमोल शहा यांच्याकडुन पाबळ महाविद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन

 

 

कवठे येमाई (धनंजयसाळवे)-शिरूर येथील श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) यांचे वतीने दिनांक ३१/०३/२०२२ रोजी पाबळ येथील भैरवनाथ विद्या मंदिर येथे आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व पौगंडावस्थेतील बदल या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. 

या वेळी प्राचार्य अमोल शहा सर यांनी मुलींशी चर्चा केली. मुलींना मासिक पाळी, शारीरिक बदल या विषयावर बोलता आलं पाहिजे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट सर्वांना सांगितले संस्था कायमच शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक बांधिलकी जपत असते, तसेच येणाऱ्या काळात आजूबाजूच्या सर्व गावांतील शाळा-महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे असे त्यांनी सांगितले व सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानले तसेच प्राचार्य अविनाश क्षीरसागर सर यांनी सर्वांचे स्वागत केले व श्रीफळ देऊन सत्कार केला .अश्याप्रकारे आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे ते म्हणाले व अशे कार्यक्रम घेतले जावे अशी त्यांनी विनंती केली.यावेळी श्री.थिटे सर यांनी स्वर्गीय श्री.बापूसाहेब थिटे यांच्या आठवणींना उजाळा दिला व विद्यार्थिनींना त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे श्री.संतोष क्षीरसागर सर यांनी केले.

प्रा. हेमांगी झिंजूर्के यांनी मासिक पाळीबद्दल योग्य माहिती दिली कारण ग्रामीण मुलींमध्ये या संबंधित शास्त्रोक्त माहिती नसल्यामुळे कुटुंबाकडून यावेळी आधार, सॅनिटरी नॅपकिनचा वापर व त्यांची योग्य विल्हेवाट याचा अभाव दिसून येतो, सॅनिटरी पॅडसाठी योग्य पर्याय म्हणून मेंस्ट्रुअल कप, टॅम्पोन्सचा वापर पर्यावरण पूरक आहे असे त्या म्हणाल्या व प्रा. विजया पडवळ यांनी पौगंडावस्थेतील बदल या विषयांवर मुलींना शारीरिक, सामाजिक, भावनिक, मानसिक व बौध्दिक होणारे बदल यांची माहिती दिली व त्यावर भविष्यात अडचणींची संभाव्यता भासू नये यासाठी प्रतिबंधक उपाय देखील सांगितले. अश्याप्रकारे दोघींनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ३५० मुली उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमास प्रा.प्राची भालेकर मॅडम,उपप्राचार्य श्री.पिंगळे सर ,पर्यवेक्षक ताम्हणे सर , रणपिसे मॅडम व पलांडे मॅडम उपस्तिथ होत्या.

या कार्यक्रमात उपस्तिथ सर्व मुलींना संस्थेच्या वतीने सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रजी थिटे यांनी शुभेच्छा दिल्या व तसेच भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ चे अध्यक्ष भगवंत घोडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleई-पॉस मशिन तांत्रिक अडचणी दुर करण्याबाबत शिरुर तहसिलदारांना रेशन दुकानदार संघटनेकडून निवेदन
Next articleगृहमंत्री श्री.दिलीपरावजी वळसे पाटील यांचा कवठे येमाई येथे जनता दरबार