पाटस ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग निधीसह वजन काटे साऊंड सिस्टिमचे वाटप

योगेश राऊत ,पाटस

दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतच्या वतीने दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधीचे वाटप करण्यात आले .तसेच अंगणवाडी सेविका यांना वजन काटे ,लहान मुलांना प्रोटीन पावडर व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा पाटस यांना साऊंड सिस्टिम संचचे वाटप करण्यात आले .

या वेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन सत्वशील शितोळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शितोळे , दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सागर शितोळे पाटील,पाटस गावचे विद्यमान सरपंच अवंतिका ताई शितोळे उपसरपंच छगन तात्या म्हस्के ग्रामपंचायत मा. उपसरपंच शिवाजी बापू ढमाले ,अपंग संघटनेचे सर्वू पदाधिकारी , अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग यावेळी सर्व पाटस ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगताप सर यांनी केले. तर आभार ग्रामपंचायत सरपंच सौ अवंतिका शितोळे यांनी मानले

Previous articleचांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर जि. पुणेेे येथे एल.ई.डी.बल्ब उत्पादन कार्यशाळा आयोजित केली गेली
Next articleई-पॉस मशिन तांत्रिक अडचणी दुर करण्याबाबत शिरुर तहसिलदारांना रेशन दुकानदार संघटनेकडून निवेदन