अवसरीत दिव्यागांसाठी मोफत शिबिर

मंचर

 राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीप (Adip) योजनेंतर्गत आणि खासदार सुप्रियाताई सुळे व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सदस्या पूर्वाताई वळसे पाटील यांच्या पुढाकाराने शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव ) येथे ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्ती व दिव्यांग बंधू-भगिनींसाठी कृत्रिम अवयव सहाय्यभूत साधनांच्या मोफत वाटपासाठी पूर्व तपासणी, मोजमाप व नाव नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले.यास उत्तुंग असा प्रतिसाद मिळाला आहे.

अवसरी खुर्द येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दोन दिवस शिरूर तालुक्यात शिबिर सुरु होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. या वेळी आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील वयोवृद्ध नागरिकांना पुढचे तीन दिवस चालणाऱ्या शिबिराच्या माध्यमातून कृत्रिम अवयव आणि इतर सहाय्यभूत साधने मिळणार आहेत. या शिबिरासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत आहेत, हे पाहून बरं वाटलं. अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम राबविल्याबाबत सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करतो. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते, शासकीय यंत्रणा, पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका झटत आहेत. आंबेगाव येथील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे अवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. देवेंद्रशेठ शहा, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, विवेक वळसे पाटील, माऊली आप्पा गावडे, दत्ताशेठ थोरात, प्रदीप वळसे पाटील, आनंदराव शिंदे, अरुणाताई थोरात, उषाताई कानडे, सुभाषराव मोरमारे, प्रकाशराव घोलप, सुषमाताई शिंदे, संतोष भोर, अंकित जाधव, सुहासभाऊ बाणखिले, अंकिता शिंदे तसेच तालुक्यातील ज्येष्ठ, महिला, युवती, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleविकास सोसायट्यांद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध व्यवसाय करावेत – सचिन सरसमकर
Next article“आमदार आपल्या गावी मुक्कामी” उपक्रमाची तुळापूर पासुन होणार सुरुवात