“आमदार आपल्या गावी मुक्कामी” उपक्रमाची तुळापूर पासुन होणार सुरुवात

उरुळी कांचन

आमदार गावात आल्यास त्यांच्या माध्यमातून गावच्या समस्या सोडवण्याचा बहुतांश ग्रामस्थांचा प्रयत्न असतो. मात्र कार्यक्रमाच्या घाईत इच्छा असूनही ग्रामस्थांना पुरेसा वेळ मिळत नाही हीच बाब लक्षात घेऊन.शिरूर-हवेलीचे आमदार ॲड् अशोक रावसाहेब पवार यांनी आता समस्या सोडवण्यासाठी गावातच मुक्कामी थांबण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी आमदार आपल्या गावी मुक्कामी हा उपक्रम सुरू केला असून तुळापूर गावापासून याची सुरुवात करणार असल्याची घोषणा आमदार अशोक पवार यांनी केली आहे. अभिनव प्रयोग, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्या बाबत आमदार अशोक पवार नेहमीच आग्रही असतात ,आजवर अनेक प्रभावी उपक्रमासाठी घेतलेला पुढाकार राज्य पातळीवर यशस्वी ठरलेला आहे.

या उपक्रमा अंतर्गत आमदार सायंकाळी गावात येणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत गावातच मुक्कामी राहून गावातील समस्या तसेच विकास कामांबाबत ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत, एवढेच नव्हे तर संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन त्याच आठवड्यात या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे.

या उपक्रमामुळे ग्रामस्थांना आमदारांशीं निवांतपणे चर्चा करता येणार असून, अधिकाधिक प्रश्न मांडून विकास कामे तशीच नाविन्यपूर्ण योजना अमलात आणता येणार आहेत.

Previous articleअवसरीत दिव्यागांसाठी मोफत शिबिर
Next articleकोरोनामुक्ती’ची पहाट घेऊन आलेला गुढीपाडवा राज्यात सुख-समृद्धी,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो – उपमुख्यमंत्री अजित पवार