विकास सोसायट्यांद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध व्यवसाय करावेत – सचिन सरसमकर

नारायणगाव (किरण वाजगे)

विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी आपण वेगवेगळे व्यवसाय करू शकतो आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असे व्यवसाय सहकारी सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु करावेत. असे आवाहन जुन्नर तालुक्याचे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी नारायणगाव येथे नुकतेच केले.

अर्थ संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नारायणगाव परिसरातील आठ गावांमधील नुकत्याच झालेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळांच्या व पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात श्री सरसमकर बोलत होते.

याप्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, युवा नेते अमित बेनके, जयहिंद पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाबशेठ नेहरकर, अर्थसंपदा चे अध्यक्ष रमेश मेहत्रे, वारूळवाडी चे सरपंच राजेश मेहेर, माजी सरपंच जंगल कोल्हे, ज्योती संते तसेच नारायणगाव आर्वी गुंजाळवाडी, येडगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, खोडद, मांजरवाडी, वडगाव कांदळी येथील विकास सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक, पदाधिकारी तसेच शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी अमित बेनके यांनी विकास सोसायटीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. संतोषनाना खैरे यांनी देखील विकास सोसायटीच्या माध्यमातून शीतगृहासारखे मोठे प्रकल्प उभारता येऊ शकतात. शेती अवजारे खरेदी विक्री, खते औषधे विक्री शेती उपयोगी उद्योग उभारू शकतो असे सांगितले. यावेळी गुलाब नेहरकर, विजय दरेकर, यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली खैरे यांनी केले. तर अध्यक्ष रमेश मेहेत्रे यांनी आभार मानले.

Previous articleकै.रविंद्र गायकवाड यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त गायकवाड कुटूंबीयांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Next articleअवसरीत दिव्यागांसाठी मोफत शिबिर