मुंबई पुणे एक्सप्रेसवर चार कोटी रोख रक्कमेसह दोघांना लोणावळा पोलीसांनी घेतले ताब्यात

श्रावणी कामत

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर अवैध्य रित्या पैशाची वाहतुक करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चार कोटीची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

महेश नाना माने ( रा. विठा, जि. सांगली ) व विकास संभाजी घाडगे ( रा.शेटफळ , जि. सांगली ) यांना ताब्यात घेण्यात आले असून एवढी रोकड कुठे व कशासाठी आणली जात आहे यावर तपास सुरु आहे .

लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांना खबर मिळाली होती की मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गांवरून अवैध रोख रक्कम व शस्त्र वाहतूक होत असल्याची पक्की खबर मिळताच याची सहनिशा करण्यात साठी लोणावळा ग्रामीणचे पोलीसांचे एक नेमण्यात आले सायंकाळी 6: 00 वा.च्या. दरम्याण संशयीत कार क्र. KA-53 MB-8508 मारुती स्विफ्ट कार ही मुंबईकडुन पुण्याकडे जाताना निदर्शनास आली चालकास कार थांबवण्याचा इशारा केला असता कार न थांबवता ती पुढे निघुन जावु लागली त्यावेळी पोलीस पथकाने शिताफिने ति कार ताब्यात घेतली कार चेक करण्यात आली तेव्हा सदर कार मध्ये एक चोर कप्यात 4 करोड रुपयाची रोख रक्कम मिळून आली.

सदर रकमेबाबत कार मधील दोन्ही इसमांना विचारपुस करण्यात आली.त्या संबंधी कोणतीही कागदपत्रे अथवा पुरावे, वाहतुक परवाना,त्याबाबतचे कारण विशेत करता व सादर करता आले नाही सदरच्या रक्कमेबाबत माहिती घेण्याचे काम चालु असुन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लपून छपून कोठुन व कशासाठी आनली या बाबतची माहीती व शोध घेण्यात येत असुन सदर प्रकरणी आयकर विभाग पुणे यांना कळविण्यात आले असून पुढिल कारवाई आयकर विभाग हे करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा राजेंद्र पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रविण मोरे , पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर , पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे , सहाय्यक फौजदार शिताराम बोकड , युवराज बनसोडे , पोलीस हवालदार अमित ठोसर , महीला पोलिस नाईक पुष्पा घुंगे, पोलीस नाईक गणेश होळकर , किशोर पवार , पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे , प्रणयकुमार उकिर्डे, होमगार्ड शिर्के ,अनिकेत इंगवले , मराठे यांनी केली आहे .

Previous articleआळंदीतील फुटपाथवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मनसेची मागणी
Next articleकुरकुंभ घाटाच्या कामाच्या ठेकेदाराच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ मनसेचे रस्ता रोको आंदोलन