आळंदीतील फुटपाथवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मनसेची मागणी

आळंदी येथील प्रदक्षणा रोड परिसरात अनेक ठिकाणी बाहेरून आलेले भाविक मंडळी आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करून दर्शनासाठी जात असतात. पार्किंगची अपुरी सुविधा व नो पार्किंग चे कुठेही साईन बोर्ड नसल्याकारणाने येणारे भाविक रोडच्या साईडला गाड्या पार्क करून दर्शनाला जातात. तसेच संपूर्ण आळंदीतील देहु फाटा ,वडगाव चौक , चाकण चौक , मरकळ चौक, वडगाव रोड परिसरात स्थानिक व्यापाऱ्या व्यतिरिक्त बाहेरील व्यापारी येऊन फुटपाथवर अतिक्रमण करत आहेत , त्या मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हा सर्व प्रकार त्वरित बंद करून फळविक्रेते व इतर बाहेरील व्यापाऱ्यांना आळा घालण्याची मागणी केली आहे.

दोन्ही मागण्या येत्या पाच दिवसात पूर्ण कराव्यात पूर्ण कराव्यात अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना आळंदी शहराच्या वतीने आणि सर्व रहिवासी नागरिकांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

अजय तापकीर मनसे शहर अध्यक्ष, मंगेश काळे विद्यार्थी सेना अध्यक्ष आळंदी  व सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Previous articleउन्हाळ्याची चाहुल लागताच थंडगार पाण्यासाठी माठांना मागणी
Next articleमुंबई पुणे एक्सप्रेसवर चार कोटी रोख रक्कमेसह दोघांना लोणावळा पोलीसांनी घेतले ताब्यात