उन्हाळ्याची चाहुल लागताच थंडगार पाण्यासाठी माठांना मागणी

कवठे येमाई  – मार्च चा महिना संपत आला की उन्हाळ्याची चाहुल हमखास लागते. एप्रिल व मे हे महिने कडक उन्हाळ्याचे असतात.या बरोबर लोकांचे पाय कुंभारवाड्याकडे माठ खरेदीसाठी वळु लागतात.आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज असतो परंतु माठातल्या पाण्याची सर त्याला नसते .त्यामुळे अनेक जण माठालाच पसंती देतात. कवठे येमाई येथील श्री. गोपीनाथ फकिरा कुंभार,श्री. बाळासाहेब बाबुराव कुंभार,श्री. गणेश बाबुराव कुंभार हे माठ बनविण्याचे व विक्री करण्याचे काम करतात.

माठ बनविण्यासाठी विशिष्ठ प्रकारची माती लागते ती माती लवकर भेटत नाही ज्याच्या कडे आहे त्याच्याकडुन जास्त भावाने घ्यावी लागते.पुर्वी माती वाहातुकीसाठी गाढवे असायची परंतु आता चारचाकी वाहने भाड्याने करावी लागतात. मडके भाजण्यासाठी अव्हा भट्टी लावावी लागते त्याच्या जळणाचा, सरपानाचा खर्च वाढला आहे . त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

कुंभारांची मुलेही आता दुसऱ्या व्यवसायांकडे वळली आहेत किंवा कंपनीत काम करुन ह्या व्यवसायाकडे लक्ष देतात पुर्वी बलुतेदार पध्दत असायची त्यामुळे परीवाराचे भागायचे .परंतु आता ह्या व्यवसायात परप्रांतीयांच्या अतिक्रमणामुळे या व्यवसायावर मर्यादा येत आहेत असे बाळासाहेब व गोपीनाथ यांनी सांगितले. पंधरा लिटर माठाची किंमत दिडशे ते दोनशे तर वीस लीटर माठाची किंमत दोनशे ते अडीचशे आहे.माठातले पाणी हे आरोग्यदायी असते.

Previous articleमहाबळेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय थायबॉक्सीगं स्पर्धेत मावळातील तृप्ती निंबळेने पटकावला टायटल बेल्ट
Next articleआळंदीतील फुटपाथवरील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मनसेची मागणी