महाबळेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय थायबॉक्सीगं स्पर्धेत मावळातील तृप्ती निंबळेने पटकावला टायटल बेल्ट

पवनानगर – महाबळेश्वर येथे २५ मार्च ते २७ मार्च २०२२ रोजी थायबॉक्सिगं या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये देशातील २२ राज्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये चुरशीच्या लढतींनी उपस्थितांची मने मोहुन घेतली.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.या मध्ये पिंपरी चिंचवड खेळाडुंनी चागंली कामगिरी केली. महिला ५५ ते ६० किलो वजन गटामध्ये मावळ तालुक्यातील वारु येथील तृप्ती शामराव निंबळे हिने टायटल बेल्ट ची कमाई केली.तर २५ ते ३० वजनीगटात शौर्य लाटकर याने सिल्व्हर मेडल,४० ते ४५ किलो वजनी गटात ईश्वरी बनकर हिने गोल्ड मेडल, ४५ ते ५० किलो वजनी गटात आपर्णा राऊत हिने गोल्ड मेडल तर ५५ ते ६० वजनीगटात कृष्णा दिवाकर याने ही गोल्ड मेडल पटकावले.तर यामध्ये प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचे थायबाँक्सिंग चे अध्यक्ष पाशा अत्तार व तृप्ती निंबळे यांचे या खेळाडुंना मार्गदर्शन लाभले. तर जुन मध्ये होणाऱ्या दुबई येथे होणाऱ्या देश पातळीवरील स्पर्धेसाठी तृप्ती निंबळे हिची निवड करण्यात आली आहे.त्यांनी मेडल मिळवल्या मुळे त्यांच्यावर राज्यभरातुन कौतुकाचा वर्षाव होतं आहे.

तृप्ती निंबळेची गगनभरारी सुरुच….

यापुर्वी तृप्ती ने मिळवलेले गोल्ड मेडल

भुतान,नॅशनल स्कुल गेम, मध्यप्रदेश, पंजाब, गोवा,आग्रा, असाम,पंजाब,बालेवाडी,महाबळेश्वर,लातूर,हैदराबाद,कन्याकुमारी,सातारा,तर सिल्व्हर मेडल मिळवलेले वर्ष आसाम २०१३ साली आशा अनेक ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व सिल्व्हर मेडल ची कमाई तृप्ती निंबळे हिने केली आहे. आताही तिने टायटल बेल्ट व सुर्णपदकांची कमाई केली आहे. त्यामुळे तिचे सर्वचं स्थारातुन कौतुक होतं आहे.

Previous articleशेवराआई भोसले यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारीया यांच्या हस्ते सन्मान
Next articleउन्हाळ्याची चाहुल लागताच थंडगार पाण्यासाठी माठांना मागणी