कुरकुंभ घाटाच्या कामाच्या ठेकेदाराच्या आडमुठेपणाच्या निषेधार्थ मनसेचे रस्ता रोको आंदोलन

कुरकुंभ, सुरेश बागल

बेळगाव ते मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या दौंड- कुरकुंभ घाटातील काम अपुर्ण असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडी,अपघात, खड्डयांचा त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे.मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रस्त्याला नागमोडी वळणे असल्याने मोठे खड्डे असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे परिसरात मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

घाटातील रस्ता खराब असल्याने
वाहने चालवताना टू व्हीलर आणि अन्य छोट्या गाड्यांचे व मानवी जीवन धोक्यात येत आहे तरी घाटातील खड्डे ,अपुर्ण कामे,संथगतीने चाललेले काम, ठेकेदाराचा आडमुठेपणाच्या, निषेधार्थ आज कुरकुंभ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुधिर पाटसकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर,दौंड तालुका अध्यक्ष सचिन कुलथे,महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा डेंगळे, लता बगाडे,सुरेखा बगाडे,सुरेखा लोंढे,प्रतीक्षा धनवे, मिलका हाके, दौंड शहर अध्यक्ष जमीर सय्यद, निलेश वाबळे, राजू चातू ,प्रज्योत वाघमोडे,आकाश पुजारी, प्रीतम वलेचा, संदीप बोराडे, अझर कुरेशी, स्वप्नील शिंदे,अभिजीत गुधाते, कुरकुंभ गावचे सरपंचराहुल भोसले,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिरेगावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Previous articleमुंबई पुणे एक्सप्रेसवर चार कोटी रोख रक्कमेसह दोघांना लोणावळा पोलीसांनी घेतले ताब्यात
Next articleव्होडा फोन , आयडियाच्या मुख्य कार्यालयाच्या समोर भारतीय मजदूर संघाची निदर्शने; कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी