सहजपूर फाटा ते फिल्टगार्ड कंपनी पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे: सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांची मागणी

कुरकुंभ : सुरेश बागल

दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा ते फिल्टगार्ड कंपनी पर्यंतच्या रस्त्यावरील मोठे मोठे खड्डे व साईडपटया खराब झाल्याने २-३ दिवसांनी अपघात होत आहे ..

खड्डे व साईडपटया बुजविण्यासाठी दौंड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उप अभियंता माळशिकरे साहेब व सचिन साहेबांना ७ दिवसांपूर्वी निवेदन दिले होते तसेच लवकरात लवकर रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्यासाठी विनंती केली होती तरीही कालच दुपारी खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचे ट्रेलर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी टाकलेले आहेत तरीही प्रशासनाने लवकरच खडयात मुरूम टाकून घ्यावा तसेच रस्त्यावर डांबर टाकून चांगल्याप्रकारे खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांना व प्रवाशांना सहकार्य करावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांनी प्रशासनाला केलेली आहे

Previous articleकुरकुंभ एमआयडीसीत केमिकल चोरी करणारी टोळी गजाआड
Next articleब्लॅक बेल्ट कराटे स्पर्धेत दौंडच्या खेळाडूची यशस्वी कामगिरी