कुरकुंभ एमआयडीसीत केमिकल चोरी करणारी टोळी गजाआड

कुरकुंभ: सुरेश बागल

कुरकुंभ एमआयडीसी मधील इटरणीस फाईल केमिकल्स लिमिटेड ह्या कंपनीतील केमिकल चोरी करणारे ९ जणांना दौंड पोलिसांनी अटक केली आहे. इटरणीस फाईन केमिकल्स या कंपनी मधून ५ कोटी ४७ लाख २० हजार ३८५ रुपये किंमतीचे जॉन्सन मँथे या अमेरिकन कंपनी कडून आलेले २० किलो रोडियम ऑन अँल्युमिना नावाचे केमिकल ची चोरीला झाल्याची घटना घडली होती .

याप्रकरणी राहुल बाळासाहेब काळे ( वय ३ ९ , अहमदनगर ) , अंकीत वसंतराव जाधव ( वय २४ , रा.रोटी ) , श्याम प्रदिप इंगोले ( वय २१ मुरखेड ) , महेश तात्यासाहेब गायकवाड ( वय ३४ , रा . कुरकुंभ ) , गोकुळ महादेव धुमाळ ( वय ३ ९ , रा . मुर्टी . बारामती ) , मल्लिकाअर्जुन विठ्ठल खेडगी ( वय ३१ रा . काशिमिरा ठाणे ) , डब्बू ऊर्फ भगेलु कहार ( वय ३१ राहणार उत्तर प्रदेश ) , उदयराज श्रीराम यादव ( वय 60 , मुंबई ) , विष्णू मच्छिंद्र विटकर ( रा . मोरे वस्ती , दौंड ) अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .

याप्रकरणी इटरणीस कंपनीचे अधिकारी विष्णू बाजीराव डुबे यांनी फिर्याद दिल्याने (१६ मार्च २०२२) रोजी अज्ञात चोरांच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान दौंड पोलिसांनी अवघ्या अकरा दिवसात नऊ आरोपींना अटक केली आहे . पोलीस निरीक्षक विनोद घुगे सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशील लोंढे हे तपास करीत होते . त्यांच्या तपासासाठी तीन पथके तैनात करण्यात आली होती . अखेर या पथकाला अवघ्या दहा दिवसांच्या आत चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे . या आरोपींना सोमवारी दौंड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे . अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली .

दरम्यान , पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख , बारामती अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे , पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे , सतीश राऊत , सहाय्यक फौजदार अनिल कोळेकर , पोलीस हवालदार दिलीप भाकरे , शंकर वाघमारे , पांडुरंग थोरात , सुभाष राऊत , श्रीरंग शिंदे , पोलीस नाईक राकेश फाळके , अमोल गवळी , महेश पवार , सचिन बोराडे , पोलीस शिपाई अमोल राऊत , अमोल देवकाते , योगेश गोलांडे , रवींद्र काळे आदींच्या पथकाने ही टोळी जेरबंद केली .

Previous articleचंद्रका़त मांडेकर यांचा “प्रेरणादायी पत्रकार” पुरस्काराने गौरव
Next articleसहजपूर फाटा ते फिल्टगार्ड कंपनी पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे: सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांची मागणी