रेशन दुकानात मिळणार आता जनतेसाठी विविध सेवा

कवठे येमाई (प्रतिनिधी धनंजय साळवे ) – रेशन दुकानात ई-सेवा केंद्र सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे विभागातील ९,२०० रेशन दुकाने या माध्यमातून स्मार्ट व डिजिटल होणार आहेत.बँक व्यवहार, तिकीट बुकिंग,गॅस बूकिंग,मोबाईल रिचार्जसह विविध सेवा आता प्रत्येक रेशन दुकानांमध्ये मिळणार आहेत.धान्य वितरणातील कमिशन पुरेसे नसल्याची तक्रार दुकानदारांकडून केली जात होती. त्यासाठी त्यांनी आंदोलन केले. याची दखल घेत शासनाकडून ई-सेवा केंद्रांना परवानगी देण्यात आली.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या रेशन सबलीकरणासाठी ई-सेवा (सीएससी) केंद्राबाबतच्या समझोता करारनाम्यावर मुंबई येथे स्वाक्षरी करण्यात आली.

सीएससी’मध्ये मिळणाऱ्या सेवा…

■बँकांचे व्यवहार, रेल्वे, विमान, बस तिकीट बुकिंग, वीज, फोन, पाणी बिल भरणा, विमाविषयक सेवा, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, शेतीविषयक सेवा, इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान, पॅन कार्ड, शिष्यवृत्तींचे अर्ज भरणे, विविध शासकीय दाखले, अनुदानाचे अर्ज यांसारख्या सुविधा रेशन दुकानांमध्ये मिळणार आहेत. रेशन दुकानदारांना सीएससी केंद्र सुरू करण्या बाबत करार केला.

  • या शासनाच्या निर्णयाचे शिरूर तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे अध्यक्ष श्री. कुंडलीकराव सोनवणे,उपाध्यक्ष श्री. गणेशराव रत्नपारखी,सचिव श्री.संतोषभाऊ सरोदे व सर्व रेशनिंग दुकानदारांनी स्वागत व समाधान व्यक्त करून शासनाचे आभार मानले. यापुढे रेशनिंग दुकानांमधून शासनाकडुन अजून जनतेला चांगली दर्जेदार सेवा सी.एस.सी. मार्फत मिळेल.

 

Previous articleअष्टविनायक महामार्गाचे काम लवकर पुर्ण करावे
Next articleमोटरसायकल व चारचाकी रॅली काढून बिबट सफारी आंदोलनाला पूर्व भागातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा