मोटरसायकल व चारचाकी रॅली काढून बिबट सफारी आंदोलनाला पूर्व भागातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा

नारायणगाव (किरण वाजगे)

बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांचे प्राणांतिक उपोषण आज सलग चौथ्या दिवशी देखील सुरूच आहे.जुन्नर तालुक्यातून या उपोषण आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच लंडन येथे गेली पंधरा वर्षांपासून कामानिमित्त वास्तव्य असलेल्या सागर कुलकर्णी यांनी आंदोलनाला भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला. तसेच जुन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील वडगाव आनंद पिंपळवंडी येथील कार्यकर्त्यांनी मोटारसायकल व चारचाकी रॅली काढून या आंदोलनाला पाठिंबा दिला. ही रॅली नारायणगाव येथे आली असता नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये बिकट सफारीत झालीच पाहिजे अशा घोषणा देत करत आपला सहभाग नोंदवला. तसेच आणे, बेल्हे, आळे, उंब्रज, पिंपरी पेंढार, खामुंडी, डुंबरवाडी आदी गावातील ग्रामस्थांनी जुन्नर येथे भेट देऊन सोनवणे यांच्या प्राणांतिक उपोषणाला पाठिंबा दिला.दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने सोनवणे यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानुसार त्यांची प्रकृती स्थिर जरी असली तरी खालावली असल्याचे समजते.

आज जुन्नर येथे शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे, नेताजी डोके प्रसन्ना डोके, पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, युवासेनेचे विकी पारखे,सचिन बांगर, दर्शन फुलपगार, नगरसेवक समीर भगत, नंदू तांबोळी, चंद्रकांत डोके, वडगाव आनंदचे सरपंच प्रदीप देवकर, विकास सोसायटीचे अध्यक्ष सचिन वाळुंज, शुभम वाव्हळ, कैलास वाळुंज, संतोष चौगुले, संतोष घोटणे, प्रदीप चाळक, मयूर पवार, प्रमोद गडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

वेगवेगळ्या स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना प्रशासन नेमकी बिबट सफारीच्या या आंदोलनाबाबत काय भूमिका घेते याकडे सर्व जुन्नरवासियांचे लक्ष लागले आहे.

Previous articleरेशन दुकानात मिळणार आता जनतेसाठी विविध सेवा
Next articleमातीशी इमान राखा,विषमुक्त शेती पिकवा- पद्मश्री राहीबाई पोपरे