अष्टविनायक महामार्गाचे काम लवकर पुर्ण करावे

कवठे येमाई धनंजय साळवे- अष्टविणायक महा मार्गावरील रांजनगाव गणपती ते पारगाव कारखाना दरम्यान काम अतिशय संथ गतीने चालू असल्यामुळे प्रवाशी व मालवाहतूक दारांचे खूप हाल होत आहे . हा मार्ग अनेक दृष्ट्या महत्वाचा असल्याने काम जलद होणे आवश्यक आहे . काम लवकर झाल्यास भाविक प्रवाशांचे होणारे हाल थांबतील . तरी संभतीत यंत्रणेने लक्ष्य घालणे जरूरी आहे .शेतकरी, वाहतूक व्यवसाईक ,रुग्ण ,व्यापारी,शालेय मूले ह्या सर्वच स्तरात कामाबाबत नाराजी वाढत आहे . राज्यातून व परराज्यातून भाविक व पर्यटक ही रांजनगाव भीमाशंकर ओझर लेण्याद्री माळशेज ह्या ठिकाणी जात असतात .त्या मुळे कामाची गती वाढणे आवश्यक आहे.अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघाताला निमंत्रण भेटत आहे.रस्त्यावरच्या धुळीमुळे रस्त्याकडचे दुकानदार त्रस्त झाले आहेत.तरी रस्त्याचे लवकर काम व्हावे हि मागणी नागरीकांकडुन होत आहे.

Previous articleमहाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची ऊर्जामंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा
Next articleरेशन दुकानात मिळणार आता जनतेसाठी विविध सेवा