महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची ऊर्जामंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा

कुरकुंभ: सुरेश बागल

राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती या कंपनीत कार्यरत कंत्राटी ३००० कामगारांचा भव्य पायी मोर्चा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) नेतृत्वाखाली सोमवार दिनांक २१ मार्च २०२२ रोजी मा कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य बी के सी कार्यालय बांद्रा येथे मा कामगार उपा-आयुक्त मा.मोरडे यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन कामगार कार्यालय च्या समस्या मांडल्या व दोषी कंत्राटदार व दोषी अधिकारी यांची चौकशी करून त्वरीत कारवाई करावी अशी मागणी करून मोर्चा विधान भवन मुंबईकडे निघाला. पुढे हा मोर्चा पोलिसांनी अडवला व सर्व आंदोलकांना आझाद मैदानात नेण्यात आले.

विधानभवन येथे ऊर्जामंत्री मा.ना.डॉ.नितीनजी राऊत व उर्जा राज्यमंत्री मा.ना.प्राजक्तजी तनपुरे साहेबांनी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, वरिष्ठ मार्गदर्शक अण्णा देसाई सरचिटणीस सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

आयुष्यभर कंत्राटी कामगार हा शिक्का आमच्यावर नको कंत्राटदार कामगारांचे आर्थिक शोषण करतात, कामगारांच्या खात्यातून परस्पर पैसे काढतात, रोजगारा साठी पैश्याची मागणी करतात. प्रशासनाचा अंकुश नाही या मुळे कंत्राटी पद्धत कायमची बंद करून तिन्ही वीज कंपनील कामगारांना वीज मंडळातील पूर्वाश्रमीच्या कंत्राटदार विरहित रोजंदारी कामगार पद्धती नुसार कामावर घ्यावे या मुळे कंपनीची २५ % आर्थिक बचत होईल व कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी मिळेल. या साठी तत्कालीन मा.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी रानडे समिती स्थापन केली होती त्या समितीच्या सकारात्मक अहवालाची अंमलबजावणी करावी. नवीन भरती आधी वर्षानुवर्षे कार्यरत सर्व अनुभवी कामगारांना सामावून घ्यावे. आरक्षण व वयात सवलत देऊन प्राधान्य द्यावे. २०१२ पूर्वी कार्यरत कामगारांची शैक्षणिक अहर्ता न पाहता अनुभव लक्षात घेऊन त्यांना कमी करू नये, कोरोणा काळात अपघातात मृत पावलेल्या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी, कायम कामगारांना लागू असलेल्या अपघात व वैद्यकीय विमा लागू करावा, इत्यादी प्रलंबित विषयावर मंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा केली. या बाबतीत लवकरच कंपनी प्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी सोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय करण्यात येईल.दोषी कंत्राटदार, दोषी अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करावी लागेल असा इशारा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ मागील २ वर्षे ऊर्जामंत्री यांच्याकडे प्रलंबित समस्यां साठी न्याय मागत होते सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण झाले.

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सुमारे ३००० कामगार आंदोलनात सहभागी झाले होते. अखिल भारतीय संविदा कामगार संघाचे अध्यक्ष दिनेश वसिष्ठ (हरियाणा) व प्रभारी जयेंद्र गढवी (गुजरात), भारतीय मजदूर संघाचे मुंबई विभागाचेे अध्यक्ष श्री बापु दडस, सेक्रेटरी संदिप कदम, प्रदेश सेक्रेटरी सेक्रेटरी अॅड विशाल मोहिते , कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार प्रशांत भांबुर्डीकर, श्रीमती शर्मिला पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. हजारो कामगार आंदोलना साठी उपस्थित होते.

Previous articleशिरोलीत तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleअष्टविनायक महामार्गाचे काम लवकर पुर्ण करावे